पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. ( ७३ ) कर्नल फेरे याण ता० २१ सप्टेंबर रोजी मुंबई सरकारास एक लांब रिपोर्ट केला आहे त्यांत या रंगाच्या समारंभाचे वर्णन फार सुंदर व मर्मस्पृकू आहे. सबब ते अक्षरशः टिपेत लिहून त्यांतील भावार्थ येथे लिहिला आहे तो असौं:- सन १८७२ च्या मार्च महिन्याच्या होळीच्या पूर्वी रंग खेळण्याकरितां महाराजानी मोठी तयारी करून ठेविली होती. राज- वाड्याच्या मागें त्यानों एक मोठा हौद तयार करविला होता, आणि त्यांस पळून जातां येऊं नये म्हणून शंभर दीडशें कसबिणीवर चौकी ठेविली होता. हुताशनीच्या दिवसांत नित्य हतभाग्य कसबिणींस दिवसाचे अकरापासून पांच वाजेपर्यंत गोळा करून ठेवीत असत. त्यांस अगदी बारीक वस्त्रे नेसावयास दिली होती. स्वतः महाराज व त्यांचा दिवाण आणि हरीब गायकवाड हे बंबांच्या तोट्याने त्या स्त्रियांवर रंगाचें पाणी उडवून आपले मनरंजन करून घेत होते. पाण्याने बारीक वस्त्रे भिजली म्हणजे त्या स्त्रियांचे सर्व अवयव स्पष्ट दिसावे हा खेळाचा मुख्य उद्देश होता. हा खेळ कितीएक दिवस चालवून त्या स्त्रियांस निर्दयपणाने वागविल्यामुळे पुष्कळ स्त्रिया अजारी पडल्या, आणि त्यांपैकी दोन प्राणास मुकल्या. या लेखांत अतिशयोक्तीचा भाग विशेष आहे असे नाहीं. दोन स्त्रिया प्राणास मुकल्या म्हणून जे लिहिले आहे त्यास मात्र प्रमाण नाहीं. या खेळापासून कसाबेणींला इतका त्रास झाला की, दुसऱ्या वर्षी शिमग्यांत परदेशांतील गतरजस्क कसबिणींनी बडो- द्याकडे तोंड केले नाहीं. नानासाहेब खानवीलकर, हरीबा गायकवाड, बापूसाहेब मोहिते, यांनीही सर- कारास मेजवानी करून असेच रंगाचे समारंभ केले होते. तात्या पवार नांवाचा महाराजांच्या भरंवशाचा एक खिजमतगार होता. त्यास सरकार- वाड्यांत रंग झाला त्या रात्री उलटया व जुलाब होऊन देवाज्ञा झाली. त्यास कोणी विषप्रयोग करून मारले असा महाराजांस कोणी संशय घातला त्यावरून त्यांनी आपल्या खिजमतगारांपैकी लक्ष्मण जामदार वैगेर चार असामी वाहमावरून पकडलें, आणि त्यांस

  • “ Previously to the Hoolee of March 1872 the Maharaja Mulhar Rao appears

to have made great preparations for its celebration by having a large cistern construc. ted in rear of his palace, and by placing all the prostitutes of the city to the extent of 100 to 150 under surveillance so that none could leave the city. 17. Daily for several days during the Hoolee these poor wretches had to be col- lected in the stable yard in rear of the palace between 11 A, M and 5 P. M., and hav- ing been provided with light clothing His Highness himself and his Minister and Hurriba Gaekwar and others amused themselves by setting several pumps fitted with hose, &c., to pour coloured water on them, which was obtained from the cistern. His Highness and his two friends actually directed the hoses themselves, and, as the effect of the water on the light clothing tended to render the persons of these poor wretches clearly discernible, the manner in which the hoses were directed to certain parts of their persons appears to have been the principal point of amusement to this independent Princa, and I need scracely say of proportionate disgust to his people only the very dregs of whom attended. 18. Having been for several days in succession exposed to this barbarous treat- ment, several of the women became very ill, four especially so, and out of these two died." Baroda Blue Book No. Page 47. १०