पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.

( ७ )

नवक नाहीं, परंतु रत्नांच्या सहवासाने सूत्र जसें कंठीं धारण करण्यास योग्य होते त्या न्यायाने वर लिहिलेल्या ग्रंथांचे वेचे या इतिहासांत घेतले आहेत, त्या योगानें तरी हा इतिहास सूज्ञ लोकांच्या अवलोकनास पात्र होईल अशी मला आशा वाटते.
 या इतिहासाचे मी दोन विभाग केले आहेत. पूर्वाधांत सर रिचर्ड मोड यांच्या काम- शनपर्यंतची हकीकत असून बाकीचा वृत्तांत उत्तराधांत आहे. माझ्या समजुतीप्रमाणे या ग्रंथांत खाली लिहिलेली प्रकरणे विशेष महत्वाची आणि सर्वांस अवलोकनाई आहेत.
 १. तेराव्या भागांत सर रिचर्ड मोडच्या कमिशन संबंधी विस्तारपुर्वक हकीकत सांगितली असून प्रत्येक प्रकरणाविषयी गुण दोष विचार केला आहे. याच भागांत टकर साहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुण विवेचन हे प्रकरण आहे, त्यांत इंग्रज सर- कारचा आणि हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांचा संबंध कोणत्या प्रकारचा असून देशी राजांच्या राज्यकारभारांत मध्यस्ती करण्याचा आम्हास हक्क आहे असा इंग्रज सरकार दावा सांगतात त्याविषयीं युरोप खंडांतील महापंडितांनी नी राष्ट्राची धर्मशास्त्रे रचली आहेत त्यांची प्रमाणे घेऊन प्रशस्तपणे विचार केला आहे; आणि टकर साहेब यांच्या मिनिटास एका एतद्देशीय गृहस्थाने तयार केलेला राज्यकरणनियमांचा मसुदा जोडला आहे, त्यावर चर्चा केली असून विठ्ठलराव देवाजी पांचा रेसिडंट यानी पक्ष धरल्यामुळे सयाजीराव महाराज यांजवर कसे बिकट प्रसंग गुजरले आणि काय काय कारस्थाने झाली त्याविषयीची ग्रंथांतील प्रमाणांसह हकीकत सांगितली आहे.
 २. श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांजबरोबर लग्न करून श्री. मल्हारराव महाराज यानी आपल्यावर एक नवे संकट ओढून आणिलें त्याबद्दल व कर्नल फेर यांच्या अप्रयोजक वर्तना- बद्दल सविस्तर हकीकत पंधराव्या भागांत सांगितली असून त्यावर टीका केली आहे.
 ३. कर्नल फेर यानी मुंबई सरकारच्या व हिंदुस्थान सरकारच्या हुकुमाकडे अलक्ष करून बडोद्याच्या दरबाराबरोबर यथेच्छ वर्तन केल्यामुळे त्यांस रेसिडेंटाच्या हुद्यावरून काढून टाकल्याबद्दलची साद्यंत हकीकत सोळाव्या भागांत असून कर्नल फेर यांच्या योग्यतेविषयी विचार केला आहे. या प्रकरणी हिंदुस्थान सरकार आणि मुंबई सरकार यांनमध्ये झालेला पत्रव्यवहार मोठ्या आवेशाचा असून फार मनोवेधक असल्यामुळे अवश्य पाहण्यासारखा आहे.
 ४. दादाभाई नवरोजी यानी बडोद्याची दिषाणगिरी पतकरण्यांत कांही चूक केली की काय याविषयी सत्राव्या भागांत विचार केला आहे.
 ५. आठराव्या भागांत विषप्रयोगाचे प्रकरण आहे. पाविषयींची संक्षिप्त हकीकत सांगून सार्जंट बालेन्टाईन या प्रसिद्ध ब्यारिस्टराचें मनोरम आणि उपपत्तियुक्त भाषण याचा मराठीत तर्जुमा केला असून गव्हरनर जनरल यांच्या शेवट ठरावाचेही साद्यंत मराठी भाषांतर केलें आहे व शेवटी या प्रकरणाचा थोडासा विचार केला आहे.
 ६. शेवटी उपसंहार लिहिला आहे, त्यांत बडोद्याच्या राज्यकारभारांत नी अव्यवस्था