पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)
उपोद्घात.

रेवाकाठ्यांतील संस्थानिकांबरोबर रेवाकाठ्याच्या एजंटाचा कोणत्या प्रकारचा संबंध आहे हें मला समजूं लागलें. मी एकूणीस किंवा वीस वर्षांचा झालों नाहीं तो मला लुना- वाड्याच्या दरबारांत माजिस्टची नागा मिळाली, आणि नंतर मी कारभारी झालों. लुनावाड्याच्या लोकांचा माझे ठार्थी फार अनुराग होता व आजही आहे. त्या दरबारची चाकरी सोडून बडोद्यास आल्यानंतर ह्या दरबारांत माझा दिवसानुदिवस उत्कर्ष कसा । झाला आणि मी कोण कोणती कामे केली हे या इतिहासांत मी सांगितले आहे. असा हा माझा आयुष्यक्रम आहे. तेव्हां उत्तम रीतीचा लेख लिहून मी लोकमान्य कसे व्हावे बरें ? तथापि " विषादप्यमृतं ग्राह्यं " असा न्याय आहे आणि त्याप्रमाणे पाहिले असतां सुज्ञ लोकांस या इतिहासांत ग्रहण करण्यासारखे कांहींच सांपडणार नाही असे कसे होईल ?
 मी या ग्रंयांत खालीं लिहिलेल्या ग्रंथांची प्रमाणे टिपेत इंग्रजी भाषेत दिली असून - त्यांचे तात्पर्य मराठी भाषेत लिहिले आहे:-
 १. ईस्ट इंडिया बडोदा ब्लू बुके नंबर १-७.
 २. कर्नल वालीस साहेब यानी इंग्रज सरकारचा बडोद्याच्या गायकवाडांवरोबरच संबंध कोणत्या प्रकारचा आहे त्याबद्दल एक बूक छापले आहे ते.
 ३. व्हाटेल साहेब यानी केलेले राष्ट्राचे धर्मशास्त्र.
 ४. व्हीटन साहेब यानी रचलेलें राष्ट्राचे धर्मशास्त्र.
 ५. मार्किस वेलस्ली के. जी. यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहाराची बुके आहेत ती.
 ६. एचीसन साहेब यानी तहनाम्यांचा संग्रह करून छापला आहे ती बुके,
 ७. राजा सर टी. माधवराव साहेब बडोद्याचे मुख्य प्रधान यानी आपल्या कारकीर्दी- तील राज्यकारभाराबद्दल रिपोर्ट केले ते.
 ८. सर जान के ह्यांनी १८५७च्या बंडाचा इतिहास लिहिला आहे तो. ९. लार्ड डलहौसी यांच्या कारकीर्दीचा इतिहास. १०. सर जान मालकम यांचा मध्यहदुस्थानचा इतिहास. ११. सर जान मालकम यांचे जन्मचरित्र, १२. मुंबई हायकोर्टाचे रिपोर्ट. १३. जान ब्राईट साहेब पार्लमेंटांतील विख्यात सभासद आणि अद्वितीय वक्ते यांच्या भाषणांचा संग्रह. १४. ह्यूम साहेब यांचे निबंध. १५. ड्यूक आफ वेलिंगटन यांच्या निवडक पत्रव्यवहाराचा संग्रह. १६. प्याली साहेव यानी अनेक विषयांवर निबंध लिहिले आहेत त्यांचा संग्रह.
१७. बडोद्याच्या राज्यकारभारांत कर्नल फेर यानी व जुन्या कामदार मंडळींनी आप- ल्यास कसे नाडले त्याबद्दल मि० दादाभाई नवरोजी ह्यानीं छापलेले बुक.
माझा लेख उत्तम विचार रहित आणि उत्तम वाक्ययोजना रहित असणे यांत कांहीं