पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोदूवात. झाली त्याबद्दल सर्वांशी जबाबदारी मल्हारराव महाराज आणि त्यांची कारभारी मंडळी यां- अकडेसच होती किंवा इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांच्या कांही मोठ्या चुका झाल्यामुळे ह्या परिणामावर गोष्ट आली त्याविषयों विचार केला आहे, आणि शेवटी इंग्रज सरकारानी न्यायाचे आणि उदार मनाचे वर्तन करून बडोद्याच्या राष्ट्रावर कधीही ज्याची विस्मृती व्हावयाची नाही असे आणि टिकाऊ उपकार करून आपली कीर्ति अजरामर केली, त्या- विषयों मनोत्साहे करून वर्णन करून त्या घोगानें आज जी त्या राष्ट्राची ऊर्जित दशा दृष्ट होत आहे व त्यांहूनही पुढे दिवसानुदिवस ज्यास्त उत्कर्ष होण्याची शुभ लक्षणें दृष्टीगोचर होत आहेत याविषयी आनंदयुक्त अंतःकरणाने व यथामतीने लिहिले आहे आणि शेवटी श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादूर फर नंद - ये खास - ये दौलत-ये-इंग्लिशिया यांस योडासा उपदेश करून हा ग्रंथ संप- विला आहे. तैनाती फौजेच्या संबंधाने एक बुक पूर्वीच छापून प्रसिद्ध केले आहे. तो या इति हासाचा एक भाग असल्यामुळे तो यांत पुनः छापला पाहिजे होता, परंतु ग्रंथ फार वाढला असून पैशासंबंधी अडचणीमुळे तसे करतां आलें नाहीं याबद्दल वाईट वाटते. "" 66 ह्या ग्रंथास " श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाड यांच्या कारकीर्दीतील खरा इतिहास हे नांव दिले आहे. “ खरा " या विशेषणाचें सार्थक व्हावे म्हणून पराकाष्ठेची काळजी ठेवून सत्याचा लोप केला नाही. श्रीमंत मल्हारराव महाराज यांच्या स्वभावाविषयीं आणि आचरणाविषयों यथार्थ हकीकत सांगून अविचारी लोकांस, त्यानी मला दामोदरपंत नेने याच्या पंक्तीस नेऊन बसावावें अशी देखील सामुग्री सिद्ध करून दिली आहे तेव्हां यापेक्षा सत्याला मी किति जपावें तें मला समजत नाहीं. सारांश माझ्या अज्ञातवासांत आणि दुःखदायक स्थितीत मी ज्या दरबाराचे अन्न खाल्ले आहे आणि माझ्या रक्ताचा प्रत्येक परिमाणु ज्या दरबारच्या अन्नापासून उत्पन्न झाला आहे त्या दरबारची हा इतिहास लिहून मी एक प्रकारची चाकरी बाजाविली इतकेंच नाही पण या हिंदुस्थानांतील देशी राजांची देखील सेवा केली आहे, आणि त्याबद्दल माझे मनाला जे समाधान झाले आहे हेच त्या चाकरीचा योग्य मोबदला आहे असे मी मनःपूर्वक मानतो, मग इतरांस माझे चाकरीची किंमत असो अगर नसो. रा० रा० सिताराम हरी चिपळुणकर यांचा नुकताच परिचय झाला असतां जिवलग मित्राप्रमाणे त्यानीं मला मनःपूर्वक सहाय्य केले त्याबद्दल त्यांचा आणि खान बहादूर पदमुजी पेस्तमजी व माझे परम मित्र मुंबई हायकोर्टाचे वकील रा० रा० रावसाहेब वासुदेवराव जग- नाय व शामराव विठ्ठल यानी आपल्या पुस्तकालयांतून जरूर पडली ते ग्रंथ मनोत्सा | करून माझे स्वाधीन केले त्याबद्दल त्या सद्गृहस्थांचा मी फार अभारी आहे. पुणे, तारीख ९ माहे मार्च सन १८८२. ग्रंथकार.