पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लेल्या मर्यादेचे उल्लंघन कसे झाले, आणि त्यापासून का परिणाम झाला तेही निरूपण केले आहे. मल्हारराव महाराज यांचा राज्यकारभार तर वाईट होताच पण कर्नल फेर यांच्या अयोग्य वर्तनाने त्यांत आणखी कशी भर पडली, आणि राज्यांत किती घोटाळा झाला, व राज्यकारभारांत सुधारणा करणे किती कठीण झाले, याविषयीं सर रिचर्ड मोडच्या क कमिशनाबद्दल हकीकत सांगण्यांत येईल तेव्हां विस्तारपूर्वक सांगण्यांत येईल. आतां सर रिचर्ड मीडचें कमिशन बडोद्यास घेईपर्यंत कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी झाल्या त्या सांगावयाच्या आहेत. वडोद्याचे रेसिडेंट उघडपणे मल्हारराव महाराजांविरुद्ध फिर्यादी ऐकूं ला- गले असतांही महाराज याणी आपल्या वर्तनांत कांहीं फेरबदल केली नाही. त्यांस आपण जें करितों तें वाईट करितो असे वाटत नसे, आणि तशी त्यांची समजूत त्यांच्या पूर्वजांच्या वर्तनावरून झाली होती. महाराज याणी १८७३ च्या शिमग्याच्या सणांत रंगाचा मोठा अवाढव्य स- मारंभ केला होता. या समारंभात बंबाने रंग उडवून कसविणीचे बरेच हाल केले होते. हा समारंभ कितीएक दिवस चालला होता. महाराजांची खाजगी मंडळी हत्तीवर बसून मोठ्या था- टाने शहरांत मिरवत होती, आणि त्यांच्या आणि रयतेच्या मधे रंगाचा मोठा रणसंग्राम होत होता. या स्वारीबरोबर एक मोठा बंब होता, व त्यांत रंग भरण्यासाठी रंगाने भरले- ल्या हजारों पखाली तयार ठेविल्या होत्या, व रयतेनेही चवाठ्याच्या जाग्यावर बंबा- चे मोर्चे बांधले होते. चवाठयाच्या पार निघून जावे यासाठी स्वारीबरो- बर जो बंब होता त्याचा मारा स्वारीवाले मोठ्या आवेशानें करीत असत, व त्यांस पार जाऊं देऊं नये म्हणून रयतेकडून बंबाचा मारा होत असे. हत्तींच्या तोंडावर बंबाचा मार लागू झाला म्हणजे ते मागे पळ घेत असत. स्वारीबरोबर ज्या पागा चालत होत्या त्यांची तर फारच दुर्दशा होत असे. बंबाच्या सपाटयाने निशाणदार, नगारजी, आणि वर घोड्यासुद्धां जमिनीवर उलयून पडत होते. प्रत्येक चवाव्यावरून पार जाणे या वरातीस फार कठीण पडत असे. बहुत करून शहराच्या सर्व भूपृष्ठभागावर रंगाचा आणि गुलालाचा कर्दम होत होता. ही मौज पाहण्यासाठी महाराज तावदानें लाविलेल्या गाडर्डीत बसून इकडून तिकडे फिरत होते. रंग खेळण्यासाठी परेटीवर एक मोठा मंडप तयार करविला होता, व त्याच्या दोन बाजूस हजारों खंडी पांणी माईल असे दोन हौद तयार करविले होते, आणि त्या हौदांच्या- पुढे दोन्हीही बाजूस मध्ये मोकळी जागा ठेवून, समोरासमोर बंबाच्या हारी लावल्या होत्या, व त्यांस गति देण्याकरितां शेंकडो भोई हजर ठेविले होते. महाराजांचें भोजन झाल्यावर या समारंभास दिवसाचे दहा किंवा अकरा वाजतां आरंभ होत असे, आणि बारावर चार वाजेपर्यंत एकसारखे दोन्ही बाजूचे बंब चालू असत. या रंगाचे खेळांत महाराजांची खाजगी मंडळी, कसबिणी, आणि शागीर्दपेशाची माणसे हीं मात्र होती. सरदार किंवा दरकदार अथवा कामदार मंडळीस अमंत्रण नसे व ते जातही नसत,