पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. अधिकाऱ्यांनी जी मर्यादा घालून दिली होती ती जशी काय त्यानी रद्द करून गायक- वाड सरकारच्या रयतेच्या फिर्यादी घेण्याचा त्यांस पूर्ण अधिकार दिल्याप्रमाणे ते वागूं लागले. "रेसिडेंट साहेब महाराजांवरील फिर्यादी ऐकतात हे समजल्याबरोबर मल्हारराव महाराज यांजपासून ज्यांस उपद्रव झालाहोता त्यांनी महाराजांवर रेसिडेंट साहेब यांजकडे तर फिर्यादी केल्याच, पण ज्यांस कांहीं उपद्रव झाला नव्हता तेही महाराजांविषयीं गान्हाणी सांगूं लागले, यामुळे मलहरराव महाराज यांचे सरदार व प्रजा ही वादी, मल्हारराव महाराज प्रतिवादी, आणि भाऊ पुणेकर आदिकरून मंडळी हे वादीचे वकील, असा बडोद्यांत एक नवाच घाट बनला, आणि रेसिडेंट साहेब स्वतः न्यायाधीश होऊन बसले. मल्हारराव महाराज यांच्यावर फिर्यादी करण्याचें उत्तेजन देऊन फिर्यादींची व रेसिडेंट साहे- बांची भेट करून देण्याचा धंदा भाऊ पुणेकर नांवाचा मीर सरफराजअल्लीच्या घराण्यांतील इभ्राहीम अल्लीचा कारकून आहे त्याने पतकरिला होता. या मनुष्यास मल्हारराव महाराज यांजकडून कांही उपद्रव झाला नव्हता, व त्याच्या यजमानांवर तर त्यांनी मोठा उपकार केला होता. गायकवाडासारख्या मोठ्या राजाच्या दरबारांतील रेसिडेंटाबरोबर दळणवळण असणे हे कांही त्या राज्यांत राहणाऱ्या लोकांस अल्पस्वल्प भूषण वाटत नाही. मल्हारराव महा- राज यांच्या विरुद्ध फिर्यादी करणारे लोक आणि रेसिडेंट साहेब यांचे दर्म्यान भाऊ पुणेकर मध्यस्ती करूं लागल्याबरोबर त्याच्या येथे मोठा दरबार भरूं लागला. आणि त्यास लोक बडोद्याचा बाळाजीपंत नातु * म्हणत. भाऊ पुणेकर यांस लब्धप्रतिष्ट पाहून दुसऱ्यासही तशी प्रतिष्ठा मिळवावी अशी इच्छा झाली, आणि जो तो कर्नल फेर साहेब यांच्याकडे जाणे येणे व्हावे म्हणून मल्हारराव महाराज यांच्यावर फिर्याद करणारे लोक शोधूं लागला. मल्हारराव महाराज यांजकडे राज्याधिकार कायम असतां, व रेसिडेंटानें बडोद्याच्या प्रजे- च्या कधीही फिर्यादी ऐकूं नयेत असा नियम ठरला असतां, राजरोस रीतीने कर्नल फेर ‘साहेब यानीं लोकांच्या फिर्यादी ऐकण्याचा क्रम सुरू केल्या बरोबर मल्हारराव महाराज दिवसानुदिवस अगदी निस्तेज होत चालले, व त्यांच्या प्रजेमध्ये जे दुष्ट लोक होते ते त्यांची अमर्यादा करण्यास प्रवृत्त झाले. इंग्रज सरकाराच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानांतील नेटिव राजांच्या प्रजेच्या फिर्यादीकडे कान देऊन त्यांस आश्रय दिला तर या देशांत असा कोणता राजा आहे की, तो आपल्या प्रजेवर आपले वजन ठेवून राज्यकारभार सुयंत्र चालवील. रेसिडेंटानें बडोद्याच्या दरबाराशी कसे वागावें व राजास सल्लामसलत केव्हां व कशी द्यावी हे वर सांगितले आहे, व कर्नल फेर साहेब यांच्या कारकीर्दीत पूर्वी घालून दि- यावरून साताऱ्याच्या राजकीय खटपटींत इंग्रज सररकारच्या रोसडेंटास बाळाजीपंत मातु अनु- कुल होते अशी बडोद्याच्या लोकांची समजूत झाली होती असे दिसते.