पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. घर पुरुष आपल्या ११ वर्षांच्या वयांत इंग्लंडाहून हिंदुस्थानांत आले, आणि तेव्हांपासून त्या नीतिदक्ष पुरुषाचा सर्व जन्म हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांच्या घडामोडींत गेला. या राजनीतिविशारद पुरुषानें रेसिडेंट यांस दुसरे आणखी हुकूम दिले होते त्यांचे उतारे मी टिपेंत लिहिले आहेत त्यांतील तात्पर्य असे आहे कीं, गायकवाडाच्या प्रजेस तुम्ही स्पष्ट असे सांगावें कीं, मला महाराजांच्या कारभारांत हात घालण्याचा कोणताही अधिकार नाहीं, आणि ह्या मुख्य तत्वाला बळकटी येण्यास्तव जो कोणी तुम्हाकडे अर्ज घेऊन येईल त्यास तुम्ही स्वतः ही गोष्ट कळवावी. * राज्यकारभारांत हात घालण्याचा तुझाला कांही एक हक्क नाहीं असे तुम्ही प्रत्येक वेळां लोकदृष्टीस आणावे. ब्रिटिश रोसेडेटाने नेटिव्ह राजांच्या दरबारांतील राज्यकारभारांत हात घातल्यामुळे काय परिणाम घडून येतात व त्या घासाघासीपासून नेटिव्ह राजांचे महत्व किती कमी होतें हैं जसे त्यांस कळत होतें तसे त्यांच्या इतका अनुभव ज्यांस असेल त्यांसच कळेल. मी टिपेंत दुसरे एक वाक्य लिहिले आहे त्यांत सर जॉन मालकेम साहेब म्हणतात कीं, फार काळापासून मला जो अनुभव आला आहे त्यावरून मला असे वाटतें कीं, राजाच्या राजधानीत सरकारच्या कामदारांचे राहणे, आणि त्यांच्या आफिसास लागून नेटिव्ह कामदारांचा एक मोठा समुदाय असणे, आणि बातमी कळविणारे, आणि हेर कामास लावणे, यांची कांहीं जरूरी राहिली नाहीं. ब्रिटिश सरकारचे वर्चस्व स्थापन होण्यासाठी त्यांची जरूरी होती, परंतु आतां त्या गोष्टी गैरसोयीच्या आणि घातक झाल्या आहेत. या वाक्यावरून आंतील राज्यव्यवस्थेत ब्रिटिश शेसिडेंटास प्रत्यक्षपणे ढवळाढवळ करण्याची कांहीं जरूरी नाहीं, अशी त्या वेळच्या अधिकाऱ्यांची समजूत होती, आणि बडोद्याच्या दरबारांत रेसिडेंट ठेवला असतां तो आंतील राज्यव्यवस्थेत कांहीं तरी मन घालील म्हणून त्यानी इंडिया सरकारच्या परवानगीनें रेसिडेंन्सी बडोद्यांतून काढून टाकली होती. कर्नल फेर साहेब रेसिडेंटच्या हुद्यावर आल्यावर लौकरच त्यांस बडोद्याच्या दरबारा- शीं आतील राज्यव्यवस्थेच्या संबंधाने किती मध्यस्ती करावी, याविषयी त्यांच्या वरिष्ठ

  • “ They ( the subjects of the Gaekwar) must be told that you can in no shape in

terfere with the concerns of His Highness, and to give effect to this principle it is- indispensable that you should personally convey this intimation to such individuals as make applications to you or give you petitions on any matter in which you are not bound to interfere." Malcolm's Government of India, Page 15. + “ You should indeed take every opportunity you can of disclaming all right of “ interference with internal affairs." Malcolm's Government of India, Page 17. ‡ “ 'The Governor reasoned from his own large and long experience " that the location of an officer of Government at the capital of a prince, the existence of a large native establishment attached to such officer, the employment of newsmongers and spies, though necessary in the progress of the British Government to supreme power in India, was pregnant with inconveniences and dangers, and had ceased to be neces- sary when the British suprermacy was established. " " Tho Guicowar and his e- lations with the British Government, " Page 397.