पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. (६९) टिश रेसिडेंट झाले त्यानी अगदी अक्षरशः अमलांत आणिली. सन १८२९ च्या सालांत सयाजी राव यानी इंग्रज सरकाराबरोबर केलेले करार पाळिले नाहीत म्हणून त्यांजवर इंग्रज सरकारची अतिशय खपा मर्जी झाली होती, आणि त्या प्रसंगी महाराजांवर पुष्कळ आरोपांचा भडिमार झाला होता. सयाजीराव महाराज यांच्या प्रतिपक्षकारां- स जामिनकीच्या निमित्तानें, रेसिडेंट साहेब यानी आश्रा दिल्यामुळे बडोद्याच्या राजधानीत देखील दंगे व फितूर होत असत. सयाजीराव महाराज यांची राज्यकारभार चालविण्याची रीत कशी होती हैं मागे सांगितले आहे, त्यावरून बडोद्याच्या प्रजेस महाराजांविषयी फिर्याद करण्यास कांही निमित्ते नव्हतीं असें नाहीं, परंतु बडोद्याच्या आंतील राज्यकारभारांत रेसिडेंट साहेब यानी ढवळाढवळ करून बडोद्याच्या प्रजेच्या उघड रीतीने सर्व प्रकारच्या फिर्यादी ऐकून राजांस त्यांच्या प्रजेपुढे राज्यकारभाराच्या अव्यवस्थेबद्दल म्हणून हलकेपणा आणिला नव्हता, व मुंबई सरकारांनीही तशा फिर्यादीस आश्रय दिला नव्हता. मल्हारराव महाराज आणि कर्नल फेर साहेब यांच्या दर्ग्यान जशी हंचत्वंच चालली होती तशीच सयाजीराव यांच्या आणि त्या वेळचे रेसिडेंट थॉमस वुल्यम् यांच्यामध्ये चालली होती. सयाजीराव यानी बेमुरवत रेसिडेंट साहेब यांस असे दोष दिले होते कीं, तुमच्या मुद्दाम डोळेझांकीमुळे माझ्या प्रतिपक्षकारांकडून माझी अमर्यादा होत आहे. आणि रेसिडेंट साहेब हे महाराजांच्या प्रतिपक्षकारांच्या कृत्यांचा दोष महाराजांवर ठेवीत असत. अशा प्रसंगी देखील रेसिडेंट साहेब यांच्या वरिष्ठांचे विचार कसे होते ते टिपत उतारे दिले आहेत त्यावरून चांगले ध्यानांत येईल. सयाजीराव महाराज यांच्या कारभाराची व्यवस्था चांगली नाहीं असे रेसिडेंट यांचे म्हणणे होते व त्यानीं राज्यकारभार चालविण्याविषयीं महाराजांची नालायकी दाखविली होती. त्याबद्दल सर जॉन मालकम यानीं रेसिडेंट यांस उपदेश केला आहे त्यांतील भावार्थ असा आहे की, तुम्ही महाराजांविषयीं गान्हाणी सांगतां यांत तोकाय मोठेपणा आहे, तुम्ही म्हणतां तसे सयाजीराव असतील तरच तुमच्या शहाणपणाची किंमत. ते शहाणे असले तर तुमच्या शाहणपणाचा उपयोग काय ? आबडधोबड शस्त्रानें जो चांगले काम करतो तोच कारागीर चांगला. महाराजांचा आदर मान ठेवून व त्यांच्याशी प्रेमभावाने वागून शांत आणि न्याययुक्त आचरणाने तुम्ही त्यांस न्यायी राजा आणि चांगला मित्र करूं शकाल तरच तुमचे शहाणपण खरें. * वरील वाक्यांतील विचार सर जॉन मालकम साहेब यांचे आहेत. हे राजकार्य धुरं

  • “ I must tell you that the great duty which political agents in your situation

owe the Government, is to effect good work with bad instruments. You would have no merit if Sayajee were a different character; but you will have a great deal if, be- ing what you represent him, you can, by kindness and attention, mixed with temper and judgment, render him a useful ruler and good ally. " Life and Correspondence of Sir John Malcolm, by John William Kaye, Page 376. '