पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. या वाक्यांत कोणत्या प्रसंगी इंग्रज सरकारास सल्ला देण्याचा अधिकार आहे, याचा उल्लेख झाला आहे, आणि मल्हारराव महाराज यांस त्यांच्या व मुलुखाच्या हितासाठी इंग्रज सरकारानी सल्ला द्यावी असा वेळ येऊन चुकला होता ही गोष्ट कबूल केली पाहिजे. आतां ती सल्ला इंग्रज सरकारच्या तर्फे त्यांच्या रेसिडेंटानें बडोद्याच्या राजास कोणत्या पद्धतीने द्यावी याविषयीं तारीख ३ मे सन १८२० रोजी सदहू नामदार गव्हरनर साहेब यानी रेसिडेंटास नंबर ६९० चे पत्र लिहिले आहे, तील तिसऱ्या व चवथ्या कलमांत उत्तम रीतीने सांगितले आहे. तिसऱ्या कलमांतील तात्पर्य असे आहे की, राजाने ज्या मार्गाचे अवलंबन केले त्या पासून त्याच्या राज्याला मोठा अपाय होईल असे तुह्मास वाटेल तेव्हां तुम्ही त्यास सला द्यावी, परंतु साधारण प्रतीच्या वाईट राज्यकारभारांत मध्यस्ती करण्यापासून तुम्हीं दूर राहावे हैं फार अवश्य आहे. आपल्या कारभारांत आपल्यास यश मिळणें अगर न मिळणें हें सर्वांशी आपल्याच कृतीवर व श्रमांवर अवलंबून आहे असे महाराजांच्या मनांत पूर्णपणे वागले पाहिजे; परंतु हरएक प्रसंगी त्यांच्या कारभारांत तुम्ही हात घालावयास लागलां म्हणजे सद- हे जोखमीचे महत्व महाराजांस कमी वाटूं लागेल. असे झाल्याने जो मोठा तोटा होईल तो एकदेशीं संकट टाळण्यासाठी उपाय योजून भरून काढतां येणार नाहीं; कारण त्यांच्या राज्याचे चांगले होणे त्यांच्या प्रयत्नावर अवलंबून आहे.* चवथ्या कलमांतील तात्पर्य असे आहे की, सल्ला देण्याचा प्रसंग येईल तेव्हां गोष्ट चिरडीवर न जाईल याविषयी फार काळजी ठेवून मोकळे मनाने आणि निष्कपटपणानें तुम्ही महाराजांस सल्ला द्यावी, आणि ती अशी गुप्त द्यावी की, जणो काय ती गोष्ट महाराजानी स्वतः होऊनच केली आहे, आणि सर्व प्रसंगी तुम्हावर महाराजांचा विश्वास बसेल अशा रीतीचे त्यांच्याशी वर्तन ठेवावे, आणि त्यांच्या रयतेच्या दृष्टीने त्यांच्या राज्य- कारभारांत त्यांस अगदी हलकेपणा आणूं नये. बडोद्याच्या रेसिडेंटास मुंबई सरकारानी जी मर्यादा घालून दिली होती ती एक सा- रखी सन १८२० च्या सालापासून सन १८७२च्या सालापर्यंत बडोद्यास जे जे वि

  • “You will afford your advice to the Guico war in cases where the line of conduct

adopted by the prince seeins likely to be attended with very serions injury to his state; but it is desirable that you should avoid interfering in common cases of mal- administration as more will be lost by destroying the feeling in the Guicowar that the success of his affairs depends upon his own exertions than will be gained by re- medies applied to partial evils." The Guicowar and his Relations with the British Government Page 310. + "On occasions wnere it is necessary to advise, you should be careful to give it in the least offensive manner, and with perfect frcedom and candour. 1t should be given with such privacy as to make the conduct suggested appear to originate with the Guicowar himself; and on all occasions you should spare no pains to conciliate the con- fidence and good-will of the Gnicowar as well as to upbold the character of his admi- uistration in the eyes of his subjects." I bid.