पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. बडोद्याच्या दरबारांत छिद्रावेषणी रोसडेंट नवता इतकीच काय ती उणीव होती आणि तीही लवकरच मिटली. सन १८७३च्या मार्च महिन्यांत कर्नल बार साहेब हे एकाएकी विलायतेत चारले. हे शोककारक वर्तमान मल्हारराव महाराज यांजला कळले, तेव्हां त्यांस पराकाष्ठेचे दुःख झालें. मुंबई सरकारानी ताबडतोब कर्नल फेर साहेब यांस बडोद्याचे रेसिडेंट नेमिलें, आणि त्यानीं तारीख १८ मार्च सन १८७३ रोजी आपल्या हुद्याचा चार्ज घेतला. एक किंवा दोन महिनेपर्यंत महाराजांचे आणि रेसिडेंटाचें बरेंच सुरळीत चालले होतें असें वरून दिसलें, रेसिडेंट साहेब यानी नानासाहेब खानवेलकर यांस आपल्या बरोबर मुंबईस नेऊन गवरनर साहेब यांस भेटवून आणिले होते. यावरून महाराजांविषयीं त्यांचे मन शुद्ध आहे असे वाटले होते, परंतु त्याची निवृत्ति लवकरच झाली, आणि महाराज व रेसिडेंट साहेब यांच्यामध्ये कलहास आरंभ झाला. मल्हारराव महाराज यांस राज्यपद प्राप्त झाल्यावर राज्यांतील कारभारांत अव्यवस्था झाली होती. हे निःपक्षपाताने वर लिहिले आहे, परंतु अशा प्रसंगी देखील इंग्रज सरका- रच्या रेसिडेंटाने राजाबरोबर कसे वर्तावें याविषयी त्यास मुंबई सरकारानी जे नियम घालून दिले होते त्याजविषयी येथे सांगितले असतां कर्नल फेर साहेब यानी त्या नियमाचा. किती अतिक्रम केला होता हे वाचकांच्या ध्यानांत येईल. राजाच्या व मुलखाच्या हितासाठी योग्य दिसेल ती इंग्रज सरकारानी बडोद्याचे राजास सल्ला द्यावी असा त्यांस अधिकार आहे. आतां सल्ला कोणते प्रसंगीं द्यावी आणि देण्याची पद्धत कशी हे मुंबईचे माजी गव रनर सर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब बहादूर यानीं सयाजीराव महाराज यांस बडोद्याच्या राज्याचा सर्व अधिकार देऊन आपला हात काढून घेतला त्या वेळेस त्यांस व त्या वेळेच्या रेसिडेंटास जी पत्रे लिहिली आहेत त्यांत स्पष्ट उल्लेख आहे. तारीख ३ एप्रिल सन १८२० रोजी सयाजी महाराज यांस साहेब बहादूर यानी पत्र लिहिले त्यांत टीपेत लिहिल्याप्रमाणे एक कलम आहे. त्यांतील भावार्थ असा आहे कीं, उभय संस्थानाच्या हिताचे ऐक्य असल्यामुळे जरूर पडल्यास इंग्रज सरकारास सला. देणें अवश्य आहे, परंतु साधारण (रोजच्या घडणाऱ्या) बारीक सारीक गोष्टींत इंग्रज सरकार मध्ये पडणार नाहींत. तसेच गायकवाड सरकारचे कामांत पूर्वीप्रमाणे नेटिव एजंट पडणार नाहींत. * “ The identity of interest of the two states will render it necessary for the Bri- tish Government to offer its advice whenever any emergency occurs; but it will not interpose in ordinary details, nor will its native agent take af share as formerly, in the Guicowar Government." Lieut. Colonel Wallace's Book entitled. "The Guicowar and his relations with the British Government " Page, 287.