पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ११. मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. मल्हारराव महाराज यांचें राज्य विलयास नेण्याची सामोग्री- कर्नल बार साहेब यांचा मृत्यु - कर्नल फेर यांची रेसिडेन्सीच्या हुद्यावर नेमणूक- रेसिडेन्ट साहेब यानी राजांशी कसे वागावें त्याबद्दल सर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब यांनींव सर जान माल्कम् यांनी घालून दिलेले उत्तम-नियम. त्या निय- मांचा अतिक्रम करून कर्नल फेर यांचें वर्तन, आणि त्याविषयी मुंबई सरकारची गर्भित संमति - भाऊ पुणेकर यांचा रेसिडेन्सींत प्रवेश - महाराजांवर फिर्यादी करण्याविषयों लोकांस उत्तेजन, आणि तेणेंकरून महाराज यांची हतप्रभता- सन १८७३च्या शिमग्यांतील रंगाचा अवाढव्य समारंभ-तात्या पत्रार याचा मृ- त्यु - लक्ष्मण जामदार वगैरे लोकांवर जुलूम, आणि त्यांपैकी फ टक्याच्या मारानें एकाचा मृत्यु - कर्नल फेर आणि महाराज यांच्यामध्यें सलुख करून देण्याविषयी दरबारांतील कामदार लो- कांचा प्रयत्न आणि त्याची निष्फलता-नाना साहेब खानवेल- कर यांचें दुर्वर्तन - महाराज आणि रेसिडेंट यांच्या मध्यें वाद- विवाद-महाराजांशी लक्ष्मीबाईचा संबंध-कर्नल फेर यांच्या आणि महाराजांच्या मध्यें ज्यास्त विघाड पडण्याचें कारण. आतां मल्हारराव महाराज यांचे राज्य विलयास नेण्यासाठीं जीं कांहीं निमित्ते पाहिजे होतीं, तीं सर्व सिद्ध होती. त्यांनी खंडेराव महाराजांच्या मंडळीवर पराकाष्ठेचे जुलूम केले होते. गोविंदजी नाइकास तीव्र यातना देऊन ठार मारला होता. भाऊ शिंदे यास विषप्रयोग करून मारल्याबद्दल त्यांजवर संशय आला होताच. राज्यांतील प्रजेचे अश्रु परिमार्जन करण्याच्या ऐवजी नानासाहेब खानवेलकरासारख्या मनुष्यास दिवाण नेमून प्रजेच्या दुःखांत भर घातली होती. बळवंतराव राहुरकर यांचे नायबदिवाणगिरीत यथार्थ न्याय करण्याकडे त्यांचे लक्ष होतें तें आतां जो पुष्कळ नजराणा देईल त्याचे तर्फे न्याय करण्याकडे लागले होतें, आणि नामदार व्हाइसराय व गवरनर जनरल साहेब व मुंबईचे गवरनर साहेब यांची मने दुखवून आपणास कोठेच थारा नाही, असे करून टाकले होते. निरक्षर आणि लोभी