पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांचे अन्यायानुसरण आणि दुराग्रह. पैसा बडोद्याचे राज्याचा आहे यासाठी बडोद्याच्या प्रजेस उपयोग होईल अशा रीतीने त्याचा व्यय करणे उचीत आहे असे त्यानीं मनांत आणून ते रुपये महाराजांकडे परत पाठवून दिले. महाराजांचा आग्रह असा होता की, या रुपयांचा व्यय गवरनर साहेब यानी निदान अमदाबादेस तरी काही लोकहिताचें काम करून करावा ह्मणजे त्यापासून परंपरेनें गायकवाड सरकारचे रयतेस उपयोग होईल; कारण की, अमदाबाद हे गुजरायेंतील शहर असून त्याचे भोंवताली बडोद्याचे राज्याचा मुलूख आहे, परंतु ही गोष्ट सुद्धां मुंबई सरकारानी कबूल केली नाहीं, आणि प्रत्यक्ष रीतीनें महाराजांचे रयतेसच ज्यापासून फायदा होईल असे काही कृत्य महाराजांनीच करावे म्हणून सांगितले. ते रुपये खर्च करून मग महाराजांनी बडोद्यांतील सुरसागर तलाव बांधिला. योग्य मोबदला मिळाल्यावांचून परराज्यांत पैसा जाणें ही गोष्ट त्या राज्याच्या प्रजेस अतिशय अनिष्टकारक आहे, आणि ह्मणून गायकवाडाच्या राज्यांतील पैशाचा उपयोग इंग्रज सरकारच्या प्रजेच्या हितासाठी करण्याचे मुंबई सरकारांनी नाकबूल केले याबद्दल त्यांची जितकी स्तुती करावी तितकी थोडी.* या संबंधानें बडोद्याच्या राज्याचो सांप्रतची स्थिति फार दुःखदायक झाली आहे.