पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. स्टेट सेक्रेटरीकडून खलित्याचें कांहीं एक उत्तर मिळाले नाहीं, यावरूनही मल्हारराव महाराज यांच्या हक्काबद्दल निक्षून नकार सांगणे त्यांस प्रशस्त वाटले नाही असे दिसतें. अन्यथा इतक्या विलंबाचें कांही कारण नव्हते. * मल्हारराव महाराज यांजवर अकृतज्ञतेचा व मगरुरीचा दोष कोणीही ठेवो, परंतु त्यांच्या वर्तना- वरून पाहतां ते तसे नव्हते. व्हाइसराय साहेब यांच्या दरबारास ते गेले नाहीत व मुंब- ईचे माजी गवरनर सर फिलिप उडहीस साहेब अमदाबादेस बडोद्याच्या अंगणांतून गेले असतां त्यांस निमंत्रण करून आपल्या राजधानीत त्यांचा यथायोग्य सत्कार केला नाहीं, यावरून इंग्रज सरकारांनी त्यांजवर जे उपकार केले होते ते ते विसरले व त्यानी मुद्दाम उद्धटपणाचे वर्तन केले असे कोणास वाटेल तर वाटो, परंतु यांत दुसऱ्याच्या तर्काचे प्रयोजन नाहीं. मल्हारराव महाराज यांची या बाबतीत खरी समजूत काय होती ते पाहिले पाहिजे. त्यांची वास्तविक समजूत अशी असे की, एकदां आपण गवरनर साहेब यांचे डावे बाजूस बसलो म्हणजे मग आपण होऊन आपला दावा सोडला असे होईल, आणि लोकांत आपला उपहास होईल म्हणून व्हाइसराय साहेब यांच्या व गवरनर साहेब यांच्या भेटीचा त्यांना प्रसंग टाळला. असे करण्यांत त्यानी बुद्धिपुरःसर हिंदुस्था- नांतील ब्रिटिश सरकारच्या मुख्य अधिकाऱ्यांचा अपमान केला असे मुळीच नाही. केवळ आपल्या अपमानासाठी मात्र ते भ्याले. सन १८७१ चे सालांत प्रिन्स आफ बेल्स यांची प्रकृत अत्यास्वस्थ झाल्यामुळे सर्वांनी दुःख प्रदर्शित केले होतें, व त्यांस आरोग्य झाल्यानंतर त्याबद्दल महोत्साहही करण्यांत आले होते, त्याप्रमाणे बडोद्यांतही मल्हारराव महाराजानी मोठ्या थाटमाटाने उत्साह केला होता. या उत्साहास कर्नल बार साहेब आले होते. त्यांस तो महारा- जांचा प्रेम पुरःसर उत्साह पाहून मोठा आनंद वाटला. हे दरबार बरखास्त झाल्यावर मल्हारराव महाराजानी दरबारांतील मंडळीजवळ जे भाषण केले त्यावरून इंग्रज सरकारा- विषयों त्यांची किती कृतज्ञ बुद्धि होती हैं त्यांचे भाषण ज्यांना ऐकिले त्यांस माहित आहे. प्रिन्स आफ बेल्स यांस आरोग्य होऊन हा ईश्वराने सुदीन दाखविला याबद्दल त्यांस पराकाष्ठेचा आनंद झाला होता, आणि बार साहेब यांस त्या समारंभापासून झालेला आनंद पाहून तर त्यांस अतिशय धन्य वाटली. प्रिन्स आफ वेल्स यांच्या आरोग्याबद्दल महाराजानीं समारंभ केला तेव्हां एक लाख रुपये मुंबई सरकारच्या स्वाधीन केले होते. प्रिन्स आफ वेल्स यांच्या आरोग्यापासून झालेल्या आनंदाचें लोकांस चिरकाळ स्मरण राहील असे कांहीं कृत्य गवरनर साहेब यानीं ते रुपये खर्च करून करावे असा महाराजानी आपला हेतु दर्शविला होता, परंतु या बाबतींत गवरनर साहेब यानी जो उदार विचार केला आहे तो स्तुतीस पात्र आहे. ह्या रुपयांचा व्यय इंग्लिश सरकारच्या राज्यांत करणे गवरनर साहेब यांस प्रशस्त वाटले नाहीं. हा

मल्हारराव महाराज पदच्युत झाल्यानंतर तर या हकाचा बडोद्याच्या राजानें गुपचुप रा- जीनामाच दिला.