पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांचे अन्यायानुसरण आणि दुराग्रह. दर्जास व मानमर्तव्यास जसें जपतात तसेंच हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांच्या अधि- कारास, दर्जास व मानमर्तब्यास जपतील, म्हणजे त्यांत तिळमात्र उणें पडूं देणार नाहीत, असा त्या वाक्याचा प्रशस्त अर्थ आहे. आम्हीं टिपेंत एक वाक्य लिहिले आहे * त्याचें तात्पर्य असे आहे की, तहनाम्यावरून अथवा गर्भित संमतीने चालत आलेल्या फार दिवसांच्या वहिवाटीने जर अग्रगण्यतेच्या पदव्या स्थापित झाल्या असतील तर त्या नेहेमी चालू ठेवणे अगत्याचें आहे. अशा रीतीनें एकाद्या राजाने पदवी मिळविली असेल तर त्याजविषयी वाद घातल्याने त्यास इजा दिल्यासारखें होतें, आणि तसे करणे म्हणजे त्याजविषयों तिरस्कार बुद्धि प्रगट करणे होय, किंवा ज्या कबुलातीने त्यास ती पदवी प्राप्त झाली आहे तिचे उल्लंघन करणे हो.. हे वरील वाक्य राष्ट्रांचे धर्म व हक्क कोणते याजविषयों युरोपिअन पंडितांनी जीं शास्त्रे रचली आहेत त्यांपैकी एका सर्वमान्य ग्रंथांतील आहे. मल्हारराव महाराज यांस गर्भित संमतीने चालत आलेल्या फार काळच्या वहिवाटीवरून अग्रगण्यता प्राप्त झाली होती व त्याबद्दल त्यांनी इंग्रज सरकाराबरोबर तक्रार चालविली होती, यांत कांहीं अविचार केला होता असे मुळींच नाहीं. सदहू ग्रंथांत आणखी एक वाक्य आहे ते टिपेत लिहिले आहे. त्याचे तात्पर्य असे आहे की, तहनाम्याच्या अभावी पदवीच्या संबंधाने आणि दुसऱ्या सन्मानाविषयी सांप्रदा- यिक नियमाला अनुसरून चालले पाहिजे. कांहीं कारण नसतां त्याविषयों हरकत घेतली तर त्या राष्ट्राचा अथवा राजाचा तिरस्कार केला असे होतें, आणि अशा प्रकारचें आचरण केवळ अप्रशस्थ आणि राष्ट्र परस्पराशी ज्या नियमाने वागण्यास बांधली गेली आहेत त्या विरुद्ध होय. याप्रमाणे महाराज यांच्या हक्कास आधार असतां त्या दुर्दैवी राजास दाद मिळाली नाहीं याबद्दल आपल्यास सहजच वाईट वाटेल. वर जे दोन खलिते लिहून पाठविले म्हणून लिहिले आहे, ते रवाना झाल्यानंतर सुमारें दोन वर्षेपर्यंत मल्हारराव महाराज गादीवर होते इतक्या प्रशस्त वेळेत त्यांस

  • If tho grades of precedency have been settled by treaties or by long custom

founded on tacit consent, it is necessary to conform to the established rule. To dis- pute with a prince the rank he has acquired in this manner is doing him an injury, in as much as it is an expression of contempt for him or a violation of engagements that secure to him a right. Vattel's Law of Nations, Book II, Chapter III, Page 149. ↑ In default of treatees, we ought with respect to titles, and, in general, every- other mark of honour, to confrm to the rule established by general custom. To at- tempt a deviation from it with respect to a nation or sovereign, when there is no particular reason for such innovation, is expressing either contempt or ill-will to. wards them;— a conduct equally inconsistant with sound policy and with the duties that nations owe to each other. Vattel's Law of Nations, Book II, Chapter I11, Page 153.