पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पद्रव ठेवावयाचे असेल तर आपण केलेल्या तहनाम्यांचा व दिलेल्या वचनांचा कधीही भंग करूं नये. हिंदुस्थानांतील नेटिव राजांस त्यांचा अधिकार, व दर्जा व मर्तबा याजबद्दल जें अ- भिवचन दिले आहे ते अशा तशा क्षुल्लक दस्ताऐवजांत दिलेले नाहीं, तर हिंदुस्थानां- तील राजांच्या व प्रजेच्या हक्काचें ज्या दस्ताऐवजापासून उद्धरण झाले आहे, त्या दस्ताऐवजांत हें अभिवचन दिले आहे. हा दस्ताऐवज राणी साहेब यांचा सन १८५८च्या तारीख १ नवंबरचा जाहिरनामा होय. या जाहिरनाम्यांत हिंदुस्थानांतील राजेरजवाडे आणि दुसरी प्रजा यांस आपल्या जिवापेक्षांही प्रिय असे जे हक्क आहेत ते सर्व यांत आणिले आहेत. इंग्लिश लोकांसारख्या न्यायी राजा- कडून हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांस आणि प्रजेस जे हक्क मिळावयाचे ते बहुत करून या दस्ताऐवजांत आले आहेत. फक्त ते हक्क मनःपूर्वक इंग्रज सरकारांनी पाळिले मात्र पाहिजेत. या जाहिरनाम्यांत हिंदुस्थानांतील राजेरजवाडे आणि सरदार यांच्या मान- मर्तब्याबद्दल वाक्य लिहिले आहे तें असे. “ज्याप्रमाणें आम्ही आपला अधिकार, आपला दर्जा, व आपला मर्तबा राखतों, त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतील राजे रजवाडे यांचा अधिकार, व दर्जा, व मर्तबा आम्ही राखूं " या वाक्याच्या अर्थाचें स्पष्टीकरण करण्यास कांहीं टीका करणे नलगे. आहे. आपल्यास त्यावरून स्पष्ट दिसत आहे मर्तब्याबद्दल आग्रह धरिला होता त्याबद्दल या आणि त्या वचनाचा भंग झाल्यामुळे हक्काविषयों एक नवा हृद्रोग उत्पन्न झाला आहे. कारण की, वाक्यार्थ अगदी स्पष्ट की, मल्हारराव महाराज यानीं ज्या जाहिरनाम्यांत स्पष्ट वचन दिलेले आहे, हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांस आपल्या वरील वाक्यांत असा कोणताही संदिग्ध शब्द नाहीं कीं, त्याजवरून मल्हारराव महा- राज यांच्या म्हणण्या विरुद्ध त्या वाक्याचा अर्थ करितां येईल. आज राणी साहेब यांच्या व त्यांच्या प्रतिनिधीपासून अगदी शेवटच्या पायरीच्या युरोपिअन ऑफिसरापर्यंत कोणा- च्याही मानमर्तब्यांत चालू सांप्रदायाविरुद्ध हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांनी यत्किंचित उणेपणा आणिला तर तो एक क्षणभर देखील चालणार नाहीं. मग या जाहिरना- म्यांतील वचनाच्या आधारावरून मल्हारराव महाराज यांस " माझ्या पूर्वजांस दिलेला मान मला द्या " म्हणून पूर्ण दावा सांगण्याचा कां बरें हक्क नव्हता ? व तो इंग्रज सरकारानी त्यांस कां द्यावयाचा नव्हता? मल्हारराव महाराज यांचे हक्कास वहिवाटीच्या पुराव्याचा मजबूत आधार होता. गायकवाड सरकाराबरोबर केलेल्या तहनाभ्यांतही मानमर्तब्याविषयी उल्लेख झालेला होताच, आणि त्यांत राणी साहेब यांचे जाहिरनाम्यां- तील वर लिहिलेल्या वचनाने तर विशेष बळकटी आली होती, आणि त्यांतही त्या वाक्याच्या पूर्वार्धाने तर महाराजांच्या मानमर्तव्याच्या हक्कास अतिशय बळकटी आली होती. “ आम्ही हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांचे अधिकार व दर्जा व मर्तबा राखूं' या नुस्त्या बाक्यांत आणि “ आमचा अधिकार व दर्जा व मर्तबा जसा आम्ही राखतो तसा राजे रजवाड़े यांचा राखूं " यांत मनस्वी अंतर आहे. राणी साहेब आपल्या अधिकारास, ""