पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांचें अन्यायानुसरण आणि दुराग्रह. (६१) सर माउंटू स्टुअर्ट एलफिन्स्टन, सर जॉन मालकम, लार्ड क्लेव, लार्ड दलहौ- सी, सर बाल फ्रिअर आणि दुसरे आणखी पुष्कळ पूर्वाधिकारी यांनी गायकवाडांस हा मान देऊन आपल्या महत्वास हीनत्व येईल असे मुद्दाम करून घेतले, किंवा ही एक चूक होती आणि ती त्यांच्या ध्यानांत देखील आली नाही, अशी कल्पना तर मुळींच करवत नाहीं. तेव्हां हा मान देण्यांत चूक झाली किंवा त्यांत इंग्रज सरकारच्या प्रतिनि धींची कांही अप्रतिष्ठा होत होती, असे म्हणण्यांत कांहीं वजनदारी नाहीं. केवळ पूर्वी च्या उदार मनाच्या राजनीति कुशल पुरुषांनी गायकवाडास हा एक मोठा मान देऊन हिंदुस्थानाच्या इतिहासातील त्यांच्या कीर्तिरूप हारास त्यानी आणखी एक नवे रत्न जडवून ठेविले होतें. ह्या त्यांच्या स्तुत्य वर्तनास इंग्लिश सरकारच्या प्रतिनिधींच्या प्रतिष्ठेस जे योग्य नव्हतें तें त्यांनी केले किंवा शंभर वर्षांपासून जी वहिवाट चालत आली होती ती त्यांच्या ध्यानांत देखील आली नाही असा दोष देणे हा त्यांचा उपहास करणे होय. आतां अशी जर कोणी कल्पना करील कीं, इंग्लिश लोकांस आपल्या राज्याचा पाया मजबूत करण्यासाठी आरंभी बहुत करून हिंदुस्थानांतील राजांबरोबर कांहीशी अशीच वागणूक करावी लागली, परंतु ते कृतकार्य झाल्यावर मग तशा रीतीने वागण्याचे त्यांस काय प्रयोजन आहे? तर अशी कल्पना केवळ क्षुद्र मनाच्या मनुष्यास मात्र साजेल. इंग्रज लोकांमध्ये पुष्कळ लोक अशा मोठ्या मनाचे आहेत की, इंग्रज सरकारावर ज्यांनी उपकार केले, त्यांजवर त्यांनी प्रत्युपकार करून सव्याज फेड केली असतांही आपण अनृणी झालो असे त्यांस वाटत नाही. इंग्लिश लोकांस हिंदुस्थानांत राज्य स्थापन करतांना गायकवाडाच्या साह्याची गरज लागली नाहीं असे नाही, व त्याबद्दल ते गाय- कवाडांचे उपकार स्मरतात. आतां गायकवाडावर देखील इंग्रज सरकारानी तसेच प्रत्युपकार केले आहेत. गायकवाडाच्या घराण्यांतील गादीच्या वारशाविषयों कलह आणि पेशव्यांचा गायकवाडाविषयों मत्सर त्याचा परिणाम, इंग्लिश लोकांनी गायकवाडा- च्या राज्यास आश्रय दिला नसता तर अगदी वाईट झाला असता. कुटुंबांत कलह वाढवून हे राज्य अगदर्दी लयास न्यावे असा पेशव्यांचा तर कृतसंकल्प होता, परंतु तसे घडून आले नाही, हा सर्व इंग्लिश लोकांच्या आश्रयाचा परिणाम होय. याप्रमाणे इंग्लिश राज्यास जेव्हां गायकवाडाच्या मदतीची काही गरज नव्हती आणि त्यांच्या राज्याचे अस्तित्व केवळ इंग्रज सरकारच्या आश्रयावर अवलंबून होते, तेव्हां जो बुद्धि- पुरःसर गायकवाडास मान दिला त्यामध्ये एक नवे खूळ काढून मल्हारराव महाराज यांस बेदिल करण्याचे कांहीं एक प्रयोजन नव्हते. गायकवाडाच्या दुसरे इंग्रज सरकार कितीही जरी कृतकार्य झाले तरी त्यांस आपण केलेले दिलेली वचने मोडतां येत नाहीत; कारण त्याबद्दल वारंवार त्यानी प्रतिज्ञा केल्या आहेत, व त्या पाळण्यांत त्यांचे देखील परमावधीचें हिन आहे. हिंदुस्थानचें राज्य कोणत्या उपा यानें सुरक्षित ठेवतां येईल, याविषयों इंग्लिश लोकांमधील राजनीति कुशल लोकांनी विचार करून एक सिद्धांत करून टाकला आहे की, हिंदुस्थानांतील आपले राज्य निरु-