पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. व शोभनीय झाले असते 4 मल्हारराव महाराज यानीं या बाबतीत वाजवीपेक्षां विशेष दुराग्रह धरिला. त्यांस इंग्लिश लोकांच्या विचारांत आलीकडे कसे कसे अंतर पडत चालले आहे, व एतद्देशीय . राजांविषयी त्यांचे विचार कसे बदलत चालले आहेत हे त्यांस समजले नाहीं व त्यांस समजून सांगितले तरी देखील ते त्यांस खरे वाटले नाहीं. त्यांच्या पूर्वजांबरोबर ज्या प्रेमाने व दयेने ते वागले त्याचप्रमाणे आपल्याशी वागतील असा त्यांचे मनाचा ग्रह होता, आणि नुक्तीच महाराजांबरोबर बडोद्याच्या राज्यपदाच्या संबंधाने इंग्रज सरकारानी जी उदार वागणूक केली होती ते त्यांच्या विश्वासास एक प्रमाण होते म्हणून त्यानी आपला निश्चय सोडला नाहीं, आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची मने दुखविली हे त्यांनी चांगले केले नाही, परंतु इंग्रज सरकारानी या बाबतीत मल्हारराव महाराज यांचे मन दुखविले नसते तर महाराज यांस मोठे भूषण वाटून इंग्रज सरकारच्या नांवलौकिकास विशेष ज्या हक्काचा बडोद्याच्या राजांनी इंग्रज सरकाराबरोबर त्यांचा संबंध घडल्यापासून एक सारखा शंभर वर्षे पर्यंत उपभोग घेतला होता, त्या हक्काबद्दल त्यानी मल्हारराव यांचा हिरमोड करावयाचा नव्हता. पूर्वीच्या ज्या महानमस्क इंग्लिश अधिकाऱ्यांनी गायकवाड सरकारास हा बहुमान दिला, त्यांचे विचार असे होते कीं, गाय- कवाडास हा मान देण्यांत केवळ गायकवाड यांसच भूषण नाहीं, पण विशेष भूषण तर आपणास आणि आपण ज्या राज्याचे प्रतिनिधि आहोत त्यांस आहे. गायकवाडाचे दरबारांत त्यांच्या डाव्या बाजूस बसण्यांत इंग्रज सरकारच्या प्रतिनिधित्वास लघुत्व आणण्या- सारखे काहीएक नव्हते व त्यापासून इंग्रज सरकारच्या महत्वास आणि सत्तेस कांहीं उणेपणा आला नव्हता व कधींही आला नसता. त्यांचे वर्चस्व सर्वमान्य आहे. कवाडासच इंग्रज सरकारच्या मुख्य प्रतिनिधीस तर काय पण बडोद्याच्या रेसिडेंटास देखील कांहीं मान असे घ्यावे लागतात की, तेणेकरून इंग्रज सरकार सर्वोपरी श्रेष्ठ आहेत असे बोधित होतें. नवीन रेसिडेंटाची नेमणूक झाली म्हणजे दरबारांतून त्यांस एक मेजवानी देण्यांत येत असते. ज्यांनी हे मेजवानीचे समारंभ पाहिले असतील त्यांस प्रिन्स आफ बेल्स यांस बडोद्याच्या दरबारानी मेजवानी करून जो मान दिला त्यांत क्वचितच कांही अंतर सांपडेल. अशा रीतीनें बडोद्याच्या राजानी आपल्यापेक्षां इंग्लिश राजे सर्वोपरी श्रेष्ठ आहेत असे मानिले असतां गायकवाडाच्या दरबारांत आपण त्यांच्या डाव्या बाजूस बसल्याने आपल्या प्रतिष्ठेस उणेपणा येईल असे ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींच्या मनांत वाटले तरी कसें ! या बहुमानाबद्दल आग्रह धरण्यांत मल्हारराव यांची कांही मगरुरी नव्हती व अशीही त्यांची समजूत नव्हती की, आपल्या दरबारांत ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीची अप्रतिष्ठा करावी. त्यांस येवढे वाटत होते की, माझ्या पूर्वजांवर इंग्रज सर कारच्या अधिकाऱ्यांनी जी मेहेरबानी केली त्याविषयी मला त्यानी अपात्र करूं नये. गाय- 'आजपर्यंत तुमच्या दरबारांत जी वहिवाट चालली ती इंग्लिश सरकारच्या प्रतिनिधींचे प्रतिष्ठस योग्य नव्हती, व ती वहिवाट चुकीमुळे चालली होती.' अशी दोन कारणे इंग्रज सरकाराकडून मल्हारराव महाराजांस सांगण्यांत आली होती. आलीकडच्या इंग्लिश अधिकाऱ्यां चे विचार असे क्षुद्र कां झाले ते कळत नाहीं..