पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५९) मल्हारराव महाराज यांचें अन्यायानुसरण आणि दुराग्रह. रुपये न घेण्याविषयों पराकाष्ठेचा आग्रह धरला. त्यांच्या मनांत महाराजानों में कांहीं द्यावया- चें असेल तें इंडिया असोशिएशन सभेस द्यावे असे होते, परंतु महाराजानों तें ऐकिलें नाहीं. अशा प्रसंगी देशी दरबाराशी संबंध ठेविणाऱ्या स्वार्थ साधु लोकांस आपला स्वार्थ साधून घेण्यास चांगले फावते. त्याप्रमाणे हरीचंद्र चिंतामण फोटोग्राफर यांस साधलें. खंडेराव महाराज यांचे कारकीर्दीपासून हे बडोद्यास येऊं लागले. यानी खंडेराव महा- राजांचा एक मोठ्या परिमाणाचा फोटोग्राफ घेतला होता त्याबद्दल त्यांस महाराजानी वंशपरंपरे १३२० रुपयांची असामी करून दिली होती. मल्हारराव महाराज यांचे तर्फे या वेळेस हे एजंट होऊन विलायतेस गेले. त्यांच्या खर्चासाठी महाराजानी बरीच मोठी रक्कम त्यांस दिली होती. ब्रिटिश राज्यासारख्या प्रचंड राज्याच्या इंग्लंडांतील प्रतिनिधींच्या मनांत मल्हारराव महाराजांचा हक्क अवश्य माननीय आहे असे उत- रून देऊन मल्हारराव महाराज यांचे इच्छेप्रमाणे हुकूम मिळविण्याविषयों पत्क- रलेले काम हरीचंद्र चिंतामण सारख्या साधारण गृहस्यास किती अशक्य होते याचे दरबारांतील जाणत्या कामदारांस कांहीं अज्ञान नवते, परंतु महाराजांचे सर्व लक्ष काय ते त्या गोष्टीकडे लागले होतें यामुळे त्यांत कोणी कांहीं हरकत घेतली नाहीं. या मानधन राजास गुजराथेसारख्या वह सस्योत्पादक देशाचे निःसपत्न आणि विपुल संपत्तियुक्त मोठे राज्यपद प्राप्त झाले असतां त्यांच्या पूर्वजांस इंग्रज सरकार जो मान देत होतें तो त्यांस देण्याचे वर्ज केल्यामुळे त्याविषयीं देखील ते सिथिलादर झाले. त्यांस असे वाटत असे की, याबद्दल इंग्रज सरकारानी माझी विनंती कबूल केली नाहीं तर मला गायकवाडाच्या कुळांत एक हतभाग्य जन्मला असे लोक म्हणतील, त्यापेक्षां मला हे राज्यपद मिळाले नसते तर हा डाग माझे कपाळी लागला नसता. महाराजांचा असा विचार ठरला होता कीं, आपण कृतकार्य झालो तर मुंबईस व कलकत्त्यास मुद्दाम जाऊन् व गवरनर व गवरनर जनरल साहेब यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या उपकाराबद्दल त्यांचे आभार मानावे, व मुंबई येथील व्हाइसराय साहेब यांच्या दरवारास न गेल्याबद्दल त्यांच्या मनांत कांहीं पाप आले असेल तर ते काढून टाकावें, परंतु तो योग घडून येण्याचा ईश्वरी संकेत नव्हता. Backward. ] possible for me not to hope fully, that your Lordship, after perusing the above represen tation, will adopt the only course that is open for maintaining the honour and posi- tion of the best ally, by not inflicting upon this State an unmorited and distress- ing humiliation I leave this case in your Lordship's hands with every confidence that the special honour this State has enjoyed for more than half a century and at the hands of illus- trious personages will be maintained. I have also addressed the Right Honourable the Duke of Argyll, K.T., Secretary of State for India, a khureeta to a similar effect. I romain your Excellency's sincere friend. ( Signed ) His Highness Mulhar Rao Maharaja Guicowar Senakhaskhel Sumshere Bahadoor. Baroda Palace, 5th December, 1872. S.