पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कन्या झाली. कांही तरी वाईट परिणाम झाल्यावांचून राहणार नाही, परंतु त्या दुराग्रही राजाने त्यांचे म्हणणे तुच्छ मानिले. कामदार मंडळीचा एक कट पाहून अमंत्रणाचे पत्राबद्दल उत्तर काय लिहावे हें कांहीं वेळ त्यांस सुचेना. ते जो कांही कारणे सांगत त्यांस कामदार मंडळी अनेक उपायांनी खंडून काढीत. असे कांही दिवस लोटले, इतक्यांत महाराज यांची स्त्री म्हाळसाबाई साहेब गरोदर होत्या त्या अकालींच प्रसूत झाल्या व त्यांजला एक आपल्या घराण्यांत स्त्री प्रसूत झाल्यानंतर चाळीस दिवसपर्यंत राजाने सिमोल्लघन करूं नये असा कुलाचार चालत आलेला आहे असे महाराज यानी निमित्त काढलें, आणि ते कारण अमंत्रणपत्राच्या जबाबांत लिहून पाठवावे असे कामदार मंडळीस सांगि- तलें. त्याबद्दलही मडळीनी जितकी हरकत घेववेल तितकी घेतली, परंतु महाराज कांहीं केल्या एकाचे दोन होईनात. मला दैव अनुकूळ झाले असतां माझे कामदार मला प्रतिकूळ झाले असा उलटा त्यानी अफसोस केला. शेवटी कामदारांनी निरुपाय होऊन त्यांचे म्हणण्याप्रमाणे एक पत्र लिहून तयार केले. इतक्यांत अकाली जन्मलेली महाराजांची कन्या गत झाली. तेव्हां आतां काय निमित्त सांगावें याची मल्हारराव महाराज यांस पुनः मोठी पंचाईत पडली. करून पाहावा. या काम सला घ्यावी असे महाराजांस सुचविलें. कामदार मंडळीनी असा विचार केला की, मल्हारराव आपली सल्ला तर ऐकत नाहीत. कर्नल शार्ट साहेब यानी रीतीप्रमाणे त्यांस सांगितले असतांही त्यांचे लक्षांत येत नाहीं, तेव्हां आतां कोणी तिन्हाईत मनुष्यास मध्यस्थ घालून त्यांचें मन वळविण्याचा यत्न त्यानी दादाभाई नवरोजी यांचा हे गृहस्य महाराज गादीवर आल्यानंतर एक वेळां बडोद्यास आले होते, व त्यांची आणि महाराजांची भेट होऊन त्यांस त्यानी पोषाख दिला होता. ईस्ट इंडिया असोसिएशन सभेस मदत मिळावी या हेतूनें ते आले होते, परंतु त्यावेळेस तीस दरबारांतून कांहीं आश्रय मिळाला नाहीं. मल्हारराव यानी दादाभाईची सल्ला घेण्याचे कबूल केल्याबरोबर ते इंदुरास होते त्यांस तार करून ताबडतोब बडोद्यास आजिलें, जवळ येत चालला होता. कारण कीं, दरबारचा दिवस दादाभाईची सल्ला काय आहे हे समजण्याकरितां मल्हारराव यानी कामदार मंडळीस त्यांजकडे पाठविले. मंडळीच्या व त्यांच्या मध्ये ह्या प्रकरणी भाषण झाले, त्यांत दादाभाईचा संपूर्ण अभिप्राय असा पडला की, महाराजानी दरबारास जावें हें अगदी अवश्य आहे, आणि तसे जर न केले तर त्यापासून व्हाइसराय साहेब यांचा बुध्यां अपमान केल्यासारखे होईल. हा मजकूर ऐकून महाराज खिन्न झाले. त्यांची व दादाभाईची समक्ष भेट झाल्यावर देखील दादाभाई यानी महाराजांस निक्षून सांगितले की, आपल्यास दरबारास गेलें पाहिजे. मजला अशी कांहीं दूसरी तडजोड सुचत नाहीं की, आपण बुध्यां दरबारास जाण्याची टाळाटाळ केली असे गवरनर जनरल यांचे मनांत येऊं नये, परंतु महाराजानी • त्यांस एकच उत्तर दिले. मला दरबारास जाण्याचे नाहीं हा माझा कृत संकल्प आहे.