पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ मल्हारराव महाराज यांचें अन्यायानुसरण आणि दुराग्रह (५३) झाल्यावरून त्यांच्या तर्फे फैसला केला असे " इतकेंच ल्याहावयाचें. याप्रमाणे बडोद्याचें दरबार अगदर्दी न्याय भ्रष्ट झाले होते. त्यांत नानासाहेब खानवेलकर दिवाण झाल्यावर त्याने तर महाराजांस देखील मागे सारलें. महाराजांचे मंडळीत खानवेलकरासारखा द्रव्यलोभी कोणीच नव्हता. त्यांस महाराज यानी मोठी नेमणूक करून दिली होती, मोठमोठ्या बक्षिसा दिल्या होत्या, व त्याखेरीज त्याचे घरीं कार्यप्रसंग आला म्हणजे त्यास लक्षावधी रुपये देत असत, तथापि त्याच्या तृष्णेचा नित्य नवा बहर होता. कोणतेही मार्गाने द्रव्य मिळवावे हाच काय तो त्याचा उद्देश असे. अशा लोभी मनुष्यास बडोद्याचा दिवाण नेमणे हे कृत्य अगर्दी असमंजसपणाचें होते, आणि तेणेंकरून महाराज यांच्या राज्याचा लवकर लय व्हावयाचा होता, परंतु महाराज यांस तसे वाटले नाहीं. त्यांचा काय तो विश्वास त्याजवर होता आणि त्यांच्या भावाने पाहिजे त्यास दिवाण नेमण्याची परवानगी मिळवून ठेविली होती. आपल्यामागे मल्हार- राव यांचें राज्य फार दिवस चालू नये म्हणून खंडेराव महाराज याण तसे केले होते असा अलंकार केला तरी तो शोभण्यासारखा आहे; कारण मल्हारराव महाराज यांच्या राज्याचा लय होण्यास मुख्य कारण काय तो खानवेलकर होता. महाराज याणी त्यास दिवाण नेमिले तेव्हां इंग्रज सरकारानी त्याविषयी काही हरकत घेतली नाही ही गोष्ट कर्नल शार्ट यांच्या कारकीर्दीत घडली. नाना साहेब यांस दिवाण नेमिल्यावर लवकरच कांही महिन्यांनी इंडियाचे माजी गव- रनर जनरल लार्ड नार्यब्रूक यानी मुंबई येथे सन १८७२ च्या नोवेंबर महिन्यांत मोठा दरबार केला आणि त्या दरवारास मल्हारराव महाराज यांस आमंत्रण केले होतें. या दरबारास मल्हारराव महाराज यानी जावें हें अगदर्दी अवश्य होते. कारण कीं, गाय- कवाड सरकारचा आणि इंग्रज सरकारचा पूर्वीपासून अकृत्रिम स्नेह होता व गणपतराव व खंडेराव महाराज अशा प्रसंगी दरबारास गेले होते. न सर सी. मोरे फिट् झिराल्ड गवरनर साहेब बडोद्यास आल्यावर दरबारांत अध्यक्षस्थानी बसण्याच्या मानपानांत जो कांहीं फेरफार झाला होता हें अमंत्रणाप्रमाणे दरबारास जाण्याचे कारण होते. मुंबई सरकारानी असा निश्चय केला होता की, यापुढे पहिली रीत चालू ठेवावयाची नाहीं, तथापि मल्हारराव यांस आशा होती की त्यांच्या पूर्वजांनी एक सारखा शंभर वर्षेपर्यंत ज्या मानाचा उपभोग घेतला होता तो मान न्यायी इंग्रज सरकाराकडून आम्हास मिळाल्यावांचून राहणार नाहीं परंतु तसा निकाल होण्यापूर्वी आह्मी मुंबईस गेलो आणि चालत आलेल्या रीतीविरुद्ध वहिवाट सुरू झाली म्हणजे मग आमचे म्हणणे कोणी ऐकणार नाही असे त्यांस भय वाटत होतें. होईपर्यंत डावे बाजूस बसण्याचा प्रसंग येईल तितका टाळावा असे त्यांच्या यासाठी निकाल मनांत होतें. आतां हा प्रसंग टाळण्यासाठी उपाय काय योजावा हे त्यांस सुचेना. खानवेलकर व दामोदरपंत नेने वगैरे खुशामती मंडळी खेरीज करून कामदारांनी त्यांस स्पष्ट सांगितले होते की, आपण जर दरबारास न जाल तर त्यापासून नाना साहेब दरबारांतील सर्व