पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांचे अन्यायानुसरण आणि दुराग्रह. ((५५) दादाभाई याणीही साफ प्रत्युत्तर बळवंतराव यशवंत याणी मध्यास्थ मी दरबारास गेल नाही याबद्दल गवरनर जनरल यांस कांहीं वाईट वाटू नये अशी कांहीं तुम्ही युक्ति सांगाल म्हणून तुम्हास बोलाविले आहे. दिले की, तशी युक्ति मजपाशी नाही, परंतु शेवटी केल्यावरून दादाभाई हे महाराज यांजकडे वळले. त्याणी महाराजांस सांगून पाठविलें की, मी याबद्दल कांहीं युक्ति योजली आहे ती महाराजांस समक्ष सांगेन. दादाभाई यांच्या पहिल्या विचारांत इतकें अंतर पडलेले पाहून कामगार लोकांस मोठा विस्मयच वाटला. दादाभाई यांची आणि महाराजांची पुनः भेट झाली तेव्हां त्यानी आपण योजलेली युक्ति महाराजांस सांगितली आणि त्याप्रमाणे मुंबई सरकारास एक तार करण्याचा म- सुदा केला. त्यांत येवढाच मजकूर लिहिला होता की, महाराजांची बायको, अकाली प्रसूत झाल्याने व अपत्य वियोगाने फार अस्वस्थ आहे यामुळे तिला तशी टाकून महाराजांच्याने दरबारास येववत नाही याबद्दल त्यांस फार वाईट वाटतें. दुसरे एक कलम असे होते की, मानपानाच्या संबंधाने जी नवीन तक्रार उपस्थित झाली आहे त्यामुळे महाराज दरबारास येण्यास अनमान करितात अशी शंका घेण्यांत येईल, व्हाइसराय साहेब यांचे समक्ष मुलाखतीत या हक्काबद्दलचा अनुकूल असा निकाल घेण्यास तर महाराजांस ही उत्तम संधी होती आणि ती साधण्याची महाराजांस सवड मिळत नाही याबद्दल उलटे ते दुःखी आहेत. परंतु करून महाराजांची स्त्री ह्याळसाबाई साहेब अकाली प्रसूत झाल्या होत्या, व त्यांचे अपत्य लागलीच गत झाले होते यामुळे त्यांची प्रकृत अस्वस्य होती ही गोष्ट खरी आहे, आणि म्हणून दादाभाई याणी जी युक्ति योजिली ती शहाणपणाची होती, परंतु ती केवळ वंचना होती आणि खरें कारण निराळेच होतें व त्याचे दिग्दर्शन निराळ्या रीतीने त्याच तारेंतील दुसऱ्या कलमांत झाले होतें. त्या मसुद्याप्रमाणे कर्नल शार्ट साहेब यांजकडून मुंबई सरकारास तार करून महारा- जानी आपला दुराग्रह शेवटास नेला. म यांचे दरबार आटपल्यानंतर काही महिन्यानी मुंबईचे माजी गव्हरनर सर फिलिप उडहौस अमदाबादेस गेले. तेव्हां त्यांस मल्हारराव महाराज यानी आपल्या राजधानीत मुक्काम करून आपले आदरातिथ्य स्वीकारण्याविषय विनंती न करितां ते ज्या दिवशीं बडोद्याच्या स्टेशनावरून अमदाबादेस जाणार त्याच्या पूर्व दिवशी आपण शिकारीसाठी डबक्यास निघून गेले. दिवाण यांस आगतस्वागत करण्यासाठी स्टेशनावर पाठविले होतें, परंतु गव्हरनर साहेब यानी बुध्यां स्टेशनावर गाडीच थांबविली नाही. मुंबई येथील व्हाइसराय साहेब यांचे दरबारांत एतद्देशीय संस्थानिकांच्या मानपानाच्या संबंधाने ज्या काही गोष्टी घडून आल्या त्या जेव्हां महाराजांस समजल्या तेव्हां त्यानीं दरबारच्या कामदारांस ते अदूरदृष्टी आहेत असा दोष ठेवून आपण जें केले ते चांगले मानले. परंतु त्या अविचारी पुरुषास त्यापासून भावी होणारे परिणाम कांहींच समजले नाहींत.