पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पाहिजे होती म्हणजे झाले, परंतु त्या कामदारांचे तसे सुदैव नव्हते म्हणून त्यांच्या मनातील सर्व धर्म व्यर्थ जाऊन ते मल्हारराव महाराजांच्या कारकीर्दीत कारभारांत होते, येवढ्याच कारणाने अपेशास मात्र पात्र झाले. बडोद्याचे दिवाण रावसाहेब पूर्वीच परलोकवासी झाले होते, व नंतर बळवंतराव राहुरकर नायब दिवाण होते तेही पदभ्रष्ट झाले, तेव्हां महाराज स्वतः राज्यकारभार पाहूं लागले. ते इतर कामदारांसहवर्तमान कचेरीत बसून लोकांच्या फिर्यादी ऐकत असत, परंतु त्यांच्या कारभार चालविण्याच्या पद्धतीवरून त्यापासून लोकांचें व राज्याचे हित व्हावयाचें नाहीं असें लवकरच कळून आले. महाराजांच्या कचेरीत पाहिजे त्यानें जावें व हवें तें बकावें त्याविषयी त्यास कांहीं आडकाठी नव्हती. तमाशा पाहण्यास जसे लोक जमतात तसा महाराजांच्या भोवताली लोकांचा मेळा जमत असे. महाराजांची इच्छा पाहून कांहीं वकील लोकांनी सरकारास नजराणा देऊन आपल्या कुळाचें काम दरबारांतून उलगडून घ्यावे असा धंदा पत्करला होता, आणि महाराजानीं त्यांस आश्रय दिल्याबरोबर न्यायाने दरबारांतून आपले पाऊल काढून घेतले. या धंद्यांत कांही वकिलांस बराच लाभ झालेला पाहून दुसऱ्यांसही तसे करावेसे वाटले. नजराणा देण्यांत जे वकील अग्रेसर होते त्यांस महाराजानी मोत्याच्या कंठ्या व शिरपाव दिले होते, व त्याखेरीज त्यांस कांहीं नेमणुका करून देऊन पागेतून घोडे बसावयास दिले होते. बळवंतराव राहुरकर यांच्या नायब दिवाणगिरीत जे महाराज नजराण्याच्या मोठ्या रकमेस देखील शिवत नव्हते, ते स्वतःच्या कारभारांत अगर्दी हलक्या रकमेचा देखील अंगिकार करून अन्याय करूं लागले, हे पाहून दरबारच्या कामगार लोकांस मोठे नवल वाटले. महाराजांच्या स्वभावांत एकाएकी इतका पालट कशाने पडला हे कांहीं त्यांस कळेना. कामगार लोकांनी मुकदम्याची सुनावणी करण्यास आरंभ केला नाही तोच पक्षकारांच्या वकिलानीं महाराजांच्या कानांत मंत्रोपदेश केलेच. त्यांत मुकदम्यामध्ये एकाद्या सुंदर स्त्रीचा संबंध असला आणि तिला नीटनेटकी नटवून महाराजांपुढे उभी केली म्हणजे न्याया तिला माळ घातलीच. मग तेथें नजराणा देण्या घेण्याच्या खटपटीची कांहीं गरज लागत नसे. ह्या मनोवेधक नजराण्याची दोन्ही पक्षकारांकडूनही तयारी असली म्हणजे त्या मुकदम्याचा दामोदरपंत नेने करतील तो न्याय. सर्वच मुकदम्यांत स्त्रियांचा संबंध असतो असे नाहीं व हलक्या जातीमध्ये देखील असे निर्लज्ज आणि बेअब्रूचे लोक फार थोडे असावयाचे, पण अशीं देखील कांही उदाहरणे घडून आर्ली होतीं. कामगार लोकांनी सर्वच कामामध्ये महाराजांस अन्याय करूं दिला होता असे नाही. ज्या कामांत त्यांचा अगदी नाइलाज होत असे त्या कामांत अन्याय होत होता, आणि महाराजांच्या केवळ इच्छेनेच झालेले फैसले कोणते आणि कामगार लोकांचा विचार घेऊन झालेले फैसल्ले कोणते हे वेगवेगळे दिसावे म्हणून वरिष्ठ कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी असा नेम घातला होता की, महाराजांच्या केवळ इच्छेने झालेल्या मुकदम्याच्या फैसलनाम्यांत पक्ष- कारांच्या पुराव्याच्या बळाबळाविषयों उल्लेख न करितां " हे काम महाराजांस समजावितां वादी (जसे असेल तसे) च्या तर्फे फैसल करण्याविषयों आज्ञा