पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५१ ). मल्हारराव महाराज यांचे अन्यायानुसरण आणि दुराग्रह. दिलेली देणगी कोणी बंद करूं नये, यासाठी त्यांनी आपल्या मंडळीस करून दिलेल्या प्रत्येक सनदेत ज्या शपथा लिहिल्या होत्या त्या आपणच प्रथमतः मोडल्या. आतां दिलेली संपत्ति बळवंतराव राहुरकर याजपासून कशी हरण करावी यासाठी महाराज सबब शोधूं लागले, परंतु एकादा आरोप आणून त्याची बेअब्रु करावी व त्या कैद करून त्याची मिळकत लुटून आणावी हा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. बळवंत याजवर त्यांचा विशेष राग झाला होता तरी पूर्वीच्या प्रेमाचा कांहींसा अंश तरी त्यांचे मनांत उरला होता असे दिसते. यावरून ू बळवंतराव राहुरकर यानी भिकू या नांवाची एक रक्षा ठेविली होती. ही कोणा एका मराठ्याची बायको होती, परंतु तिचा नवरा जिवंत नवता, किंवा त्याने तिला काढून दिली होती हैं समजत नाहीं. ही स्वरूपाने सुंदर असे. तिच्याकडे मल्हारराव महाराज यांचें मन गेलें, आणि त्यानी बेलाशक फौजदारीचा कारकून व कांहीं शिपाई पाठवून जबरदस्तीने तिला राजवाड्यांत आणिले. तिनें त्या वेळेस फार आकांत केला. प्रेम बळवंतराव याचे ठिकाण फार होतें, व तिला मल्हारराव महाराज जरी राजा होता तरी पसंत नव्हता, परंतु तिचें कांहीं चालले नाहीं. बळवंतराव राहुरकर याची दुसरे रीतीनें जरी निर्भर्त्सना केली नाहीं तरी बायकोप्रमाणे ज्या भिकूला त्याने वागविली तिला राजानें जबरदस्तीनें नेले ह्यांत त्याची पराकाष्ठेची विटंबना झाली. तिचें बळवंतराव राहुरकर यांजपार्शी असतांना भिकू पुष्कळ दागिने आंगावर घालीत होती, परंतु ते तिला बक्षीस दिले नव्हते. ठेवलेल्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवावा, आणि पूर्वीच्या जाराने घालण्यासाठी दिलेल्या दागिन्यावर तिने दावा सांगावा असा तिचा कांही हक्क नव्हता, परंतु मल्हारराव महाराज यांचे धर्मशास्त्र निराळेच होते. त्यांस द्रव्यापहार करावयाचा असला म्हणजे त्यानीं पाहिजे ती सबब काढून इच्छेनुरूप आपली कार्यसिद्धि करावी हाच काय तो त्यांचा न्याय होता, आणि त्यांचे अधिकारास कोणतीही मर्यादा नव्हती. त्यानीं भिकूर्चे निमित्त करून लक्षावधी यांचे दागिने बळवंतराव याजपासून मुरगाळून आणिले. त्याचप्रमाणे रोख रुपयांचाही अपहार केला, आणि बळवंतराव राहुरकर जो एक महाराज यांचे मंडळींत अद्वितीय भाग्यशाली होता तो एकाएकी परम भाग्यहीन होऊन गेला. बळवंतराव राहुरकर याचा सत्तादीप मालवल्याबरोबर अंधारांत जसें चोरांस साधते तसे दरबारांतील दुष्ट लोकांस साधले. तो स्वतः कसाही असो, परंतु त्याच्या नांवानें जो कारभार चालत होता तो चोरांस जसे चांदणे तसा दरबारांतील लोभी व बेइमानी लोकांस होता. त्याचा अधिकार जर तसाच चालला असता तर त्याच्या बळाने त्याच्या मंत्री मंडळीनी व इतर कामदार मंडळीनी मिळून बडोद्याची राज्यव्यवस्था उत्तम रूपास आणिली असती. येथे असे सांगतांना कांहीं शंका वाटत नाहीं कीं, बडोद्याचे दरबारांत जे कांहीं चांगले कामदार होते त्यांजमध्ये बडोद्याची राज्यव्यवस्था सुधारण्या- पुरते गुण होते. फक्त मल्हारराव महाराज यानी त्यांजवर सर्व जबाबदारी ठेवून आ त्यांजवर देखरेख मात्र ठेवावयाची होती, व त्या कामदारांस रेसिडेंटाची नेक नजर