पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ( ५० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कटांत नव्हते. महाराजांजवळ बळवंतराव यांचे वजन आणि वरिष्ट अदालतीच्या व नायब दिवाणगिरीच्या संबंधाने त्यांचा अधिकार, यामुळे त्यांच्या पुढे सर्व अधिकारी हतप्रभ झाले होते, आणि म्हणून कोणत्या तरी उपायाने त्यांस पदभ्रष्ट करावे, म्हणजे आपणास आपले मनोरथ पूर्ण करतां येतील असे त्यांचे मनांत आले होतें. बळवंतराव यांजवर कोणता आरोप आणावा हे त्यांच्या शत्रूस काही दिवस फार कठीण पडले होतें, तथापि शेवटी त्यांस एक छिद्र सांपडले, आणि त्या योगाने त्यांनी आपला बेत सिद्धीस नेला. गोविंदराव नाईक म्हणून एक मराठा मल्हारराव महाराज यांचा फार विश्वासुक होता, व त्याकडे राणी म्हाळसा बाई साहेब यांची देखरेख होती हैं एक ठिकाण वर सांगितलें आहे. त्याचे आणि बळवंतराव राहुरकर याचे वैमनस्य होते, परंतु मल्हारराव यानीं बळवंत- रावयास स्पष्ट सांगितले होतें की, गोविंदजी नाईक याविषयीं तुम्हीं कांहीं गाऱ्हाणे सांगूं नये. परंतु तो विश्वास फार दिवस टिकला नाही. त्याजवर जो आळ आला होता तो लेखनोचित नाही. मल्हारराव यांस जो मनुष्य अति विश्वासुक होता त्याजविषयी त्यांचे मनांत आते वि- लक्षण संशय आल्यामुळे त्यांस आपला क्रोध आवरेनासा झाला. त्यानी त्या दुर्दैवी मनुष्याचे पराकाष्ठेचे हाल करून त्यास जिवे मारिले. त्या वेळेस हें करणें तुम्हास उचित नाहीं असे जर त्यांस कोणी निक्षून सांगितले असते तर त्यांनी त्या सांगणाराचे देखील तसे हाल केले . असते; इतके ते क्रोधाविष्ट झाले होते. असे असतां नौकरीच्या नात्याने ज्यास मल्हार- राव महाराज यांचा हुकूम अंमलांत आणावा लागला त्या लोकांवर महाराज पदच्युत झाल्यावर बराच कठीण प्रसंग गुदरला आहे. गोविंदजी नाईक याचे पारिपत्य झाल्यानंतर पुढे श्रीमंत सौभाग्यवती म्हाळसाबाई साहेब यांची देखरेख बळवंतराव याजकडे आली हे त्याच्या शत्रूंस उत्तम साधन झाले. मल्हारराव महाराजांची त्याजवर इतराजी करण्यास काय तो त्या लोकांस येवढाच मार्ग खुला होता. बळवंतराव राहुरकर याने आपल्यावर एकादे वेळेस महाराजांची अवकृपा होण्याचा संभव आहे यासाठी हे काम मला नको असे महाराजांस सुचविले होतें, परंतु महाराजानी त्याची खात्री केली होती की, मला तुजविषयीं कधीं कांहीं संशय येणार नाही, परंतु हे अभिवचन व्यर्थ गेले. गोविंदजी नाईक याजवर जो आळ आणिला होता तशाच प्रकारचा कांही त्याच्या शत्रूनी त्याजवर आणून महाराजांचें मन दूषित केले. त्यानी लागलीच बळवंतराव यास आपल्यासमोर येऊं नये असे सांगितले, आणि त्याबरोबर त्याच्या वैभवाचा लय झाला. बळवंतराव याच्या ऐश्वर्याच्या क्षणिकपणाविषयी लोकांनी जसा उद्गार काढिला होता त्याप्रमाणेच खरोखर बनून आले. जशी संपत्ती झपाटयाने आली तशीच ती आतां परत जाऊं लागली. महाराजांनी त्यास इनाम, वर्षासन वगैरे जे कांहीं देऊन आपण आपल्या सह्या शिक्यानिशीं सनदा करून दिल्या होत्या ते सर्व त्यानी बंद केले. आपली