पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९) मल्हारराव महाराज यांचें अन्यायानुसरण आणि दुराग्रह. महाराज याणी त्यांस विषप्रयोग करून त्यांचा प्राण घेतला अशी त्या वेळेस लोकांत वदंता चा- लली होती. असिस्टंट रोसडेंट हेन्काक साहेब यांसही तसे कळले होतें, सबब भाऊचें प्रेत सिव्हिल डाक्तर यांस दाखविल्यावांचून दहन करूं नये अशी महाराजांस त्यानी सूचना दिली होती, परंतु त्याना ती गोष्ट कबूल केली नाहीं. याबद्दल मुंबई सरकारानी महाराजांस एक पत्र लिहिले होते त्यांत “महाराजानीं असि- स्टंट रेसिडेंटाचे सूचनेप्रमाणे भाऊ शिंदे यांचे प्रेत सिव्हिल डाक्तर यांस दाखविण्याची हयगय केल्यामुळे त्यांस विषप्रयोग करून मारल्याचा संशय दृढ झाला आहे, आणि येणेंकरून महाराजांचे राज्यावर मोठे अभ्र आले आहे व ते टाळण्यास कोणताही उपाय राहिला नाहीं " असे लिहिले होते. या पत्राचे उत्तरांत आपल्यावरचा दोष उडविण्यासाठी महाराजानी मुंबई सरकारास व नंतर इंडिया सरकारास खलिते लिहिले होते, व त्यांची उत्तरें प्रतिकूळ आल्यावर त्यानीं नामदार स्टेट सेक्रेटरी यांस पत्र लिहिले होते, परंतु त्याचे उत्तर त्यांस कांहींच मिळाले नाही.

भाऊ शिंदे यांजबरोबर हबीबुल्ला मुनसी यांसही यंत्रांत चेंगरून मारिलें असे निनावी पत्र कोणी रेसिडेन्सींत धाडले होते. हे खोटें वर्तमान मुनसी यांच्या सुटकेस कारण झालें. त्याची सहा महिन्यांची ठेप पुरी होऊन त्याजवर तीन महिने ज्यास्त झाले होते तरी त्यास सोडले नव्हते, परंतु महाराजांचे दुस्मान लोक खोट्या खोटया बातम्या उठ- 'वितात हे खरे करून दाखविण्यासाठी महाराजानी मुनसी यास कर्नल शार्ट साहेब यांचे समोर नेवविला होता, आणि यामुळे त्यास लागलीच सोडून देणें भाग झाले होतें. बळवंतराव राहुरकर यास महाराजानी प्रसिद्ध दरबार करून नायब दिवाणाची वस्त्रे दिली होती. हे कृत्य कर्नल वार साहेब असतांनाच घडले होते. या अधिकाराबद्दल इंग्रज सरकाराकडून त्यास लष्करी मान मिळावा असें महाराजांचे म्हणणे होते, परंतु कर्नल बार साहेब यानी तें ऐकिले नव्हते. नंतर बळवंतरावाच्या मुलाची मुंज झाली. तो समारंभ मोठ्या थाटाने झाला. त्या वेळेस राहुरकर याजवरील मल्हारराव महाराज यांच्या कृपेची कमाल झाली. महाराज या समारंभांत बळवंतराव यांचे घरीं स्वतः येऊन सर्व व्यवस्था ठेवीत असत. यापूर्वी बडोद्यांत राजाच्या मेहेरबानीने पुष्कळ लोक वैभवास चढले होते, परंतु असे एकाएकी वैभव कोणासही प्राप्त झाले नव्हते. बळवंतराव राहुरकर यांचे ऐश्वर्य त्याचे शत्रूंस दुःसह झाले इतकेच नाहीं, परंतु . उदासीन मनुष्यास सुद्धां तें अयोग्य पात्रीचें वैभव पहावेनासे झाले. मल्हारराव महाराज यांच्या कृपेची अतिशयताच वळवंतराव यांच्या विपत्तीस कारणीभूत झाली. नाना साहेब खानवेलकर, कमाबाई साहेब महाराजांची कन्या, खंडेराव महाराज यांची रक्षा राधाबाई, जी मल्हारराव महाराजांस वश झाली होती ती, आणि दामोदर- पंत नेने हे बळवंतराव यांचे अगदी कट्टे वैरी होते. हरीबा गायकवाड मात्र त्या मंडळीच्या

महाराज पदच्युत झाल्यावर सर लुईस पेली यानी याबद्दल चौकशी केली त्यांत खरोखर भाऊ शिंदे यांस विषप्रयोग केला होता असे सिद्ध केलें आहे.