पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १०. मल्हारराव महाराज यांचें अन्यायानुसरण आणि दुराग्रह. कर्नल बार साहेब यांचें युरोपांत प्रयाण-कर्नल शार्ट साहेब यांची त्यांच्या जाग्यावर नेमणूक-भाऊ शिंदे यांचा तुरुंगांत मृत्यु - त्यांस विषप्रयोग करून मारल्याचा मल्हारराव महाराज यांजवर मुंबई सरकारास संशय - हवीबुल्ला मुनसी याची प्रतिबंधांतून सुटका - बळवंतराव राहुरकर याच्या उत्कर्षाची कमाल - गोविंदजी नाईक याचा तीव्र यातनेपासून मृत्यु - बळवंतराव राहुरकर याचा निःपात करण्याविषयी त्याच्या शत्रूंचीं कारस्थानें आणि त्यांत त्यांची सफलता-बळवंतराव याजवर महाराजांची इतराजी आणि त्याच्या द्रव्याचा अपहार- बळवंतराव यांचा सत्तादीप मालवल्या- बर दरबारांत घोटाळा-महाराज स्वतः कारभार पाहूं लागल्यामुळे दुष्ट लोकांस कैकांची घरे बुडविण्यास उत्तेजन - नानासाहेब खान- वेलकर यांची दिवाणगिरीवर नेमणूक-लार्ड नार्थब्रूक यांच्या दरबारास न जाण्याविषयी महाराजांचा दुराग्रह-त्याबद्दल कामगार मंडळीच्या उपदेशाची निष्फलता-दादाभाई नवरोजी यांजवर महाराजांची श्रद्धा - महाराजांच्या पूर्वजांस जो मान मिळत होता महाराजांस दिला नाही याबद्दल गुणदोष विचार- प्रिन्स आफ वेल्स यांच्या आरोग्याबद्दल वडोद्याच्या दरबारांतील महोत्साह- मल्हारराव महाराज याणी मुंबई सरकारच्या स्वाधीन एक लक्ष रुपये केले होते त्या संबंधानें मुंबई सरकारचा परम स्तुत्य विचार- अशी प्रकरणें या भागांत आहेत. कर्नल बार साहेब सन १८७२ मध्ये बारा महिन्यांचे रजेवर विलायतेस गेले आणि कर्नल शार्ट साहेब यांची त्यांच्या जागेवर अक्टिंग नेमणूक झाली. कर्नल शार्ट साहेब यांचे महाराजांबरोबर कसे जमेल याजविषयीं मोठी काळजी वाटत होती, परंतु त्यांच्या वागणुकींत आणि बार साहेब यांचे वागणुकीत कांहीं अंतर दिसून आले नाही. • सर माउन्ट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब याणीं जो कित्ता घालून दिला होता त्याप्रमाणे त्यांची वागणूक होती. कर्नल बार साहेब गेल्यावर आणि कर्नल शार्ट साहेब वडोद्यास येण्याचे पूर्वी भाऊ शिंदे यांस ता० २ मे सन १८७२ रोजी एकाएकी कैदेत देवाज्ञा झाली. मल्हारराव