पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराजांच्या राज्यकारमाराची नवीन व्यवस्था. (४७) गोपाळराव मैराळ यांचे मदतगार कारभारी भाऊ खेडकर यांजवर महाराजांच्या निंदा च्छापण्यांत त्यांचे आंग होतें असा आरोप आला होता. त्या कुभांडांत व्यंकटराव मास्तर, ज्याने मल्हारराव महाराज ह्यांची कैदेतून मुक्तता व्हावी यासाठी मनस्वी श्रम केले होते तो- ही सामील होता असे ह्मणतात. हे सर्व कुभांड होते किंवा खरे होते हें कांही निश्चित- पणे सांगतां येत नाहीं. या दोषाबद्दल उभयतांसही बडोद्यांतून हकून दिले होतें. व्यंकट राव मास्तर यानीं बडोदे सोडल्यानंतर महाराजाला प्रतिकूल असे कांहीं एक विपरित आचरण केले नाहीं. महाराजांविषयीं त्याची निष्ठा जशी होती तशीच होती. भाऊ खेडकर मात्र मल्हारराव महाराज यांचे उघड प्रतिपक्षी बनले, आणि त्यापासून त्यास जो लाभ झाला त्याचा उपभोग ते आज घेत आहेत.