पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्यांच्या वाड्यांत कधीं ब्राम्हण भोजन नाहीं व हरिकीर्तन नाहीं असा दिवस विरळा. सर्वदां कांहीना काही तरी धार्मिक कृत्य चालू असेम्य. नित्य त्यांच्या पंक्तीस शेकडो मंडळी भोजनास असे. वर्षांतून गणपतीचे तीन उत्साह ते करीत असत. त्या दिवसांत नित्य हजारों ब्राम्हणांस भोजन मिळत असे, व हरिकीर्तनांनी व इतर धार्मिक कृत्यांनी अष्टोप्रहर त्यांचा वाडा दुमदुमलेला असे. रावसाहेब यांची कुलपरंपरा गाणपत्य आहे. त्यानी एक गणपतीचे मंदिर बांधिलें व त्या देवस्थानाचा खर्च मोठ्या थाटाने त्यानीं चालविला होता. या देवस्थानास सरकारांतून एक गांव दिलेला आहे. आहे, रावसाहेब यांचे प्रकृतीस औषधोपचार करण्यासाठी मुंबईचे प्रसिद्ध डाक्तर भाऊ दाजी यांस आणिलें होतें. तीन चार महिने बडोद्यास राहून त्यांनी त्यांस एका व्याधीपासून बरें केलें होतें, महिन्यापेक्षां रावसाहेब परंतु त्यांनी असे निदान केले होते कीं, सहा ज्यास्त दिवस जगणार नाहींत. आणि त्याचप्रमाणे घडून आले. रावसाहेब व्याधिग्रस्त असतां त्यांचे पांचवें कुटुंब गरोदर होतें. लोकांस अशी आशा होती की त्या बाईस पुत्र होईल, परंतु त्यांच्या प्रसूतीचा परिणाम राणी जमनाबाई साहेब यांच्या प्रसूतीप्रमाणेच होऊन त्यांस कंन्या झाली. बाई प्रसूत झाल्यावर रावसाहेब चौथे दिवशी म्हणजे संवत १९२८ च्या वैशाख वद्य ४ स परलोकवासी झाले, रावसाहेब यांच्या मृत्यूपासून बडोद्याचे लोकांस पराकाष्ठेचें दुःख झाले. त्यांचे प्रेत स्मशानांत नेतांना हजारों लोक बरोबर होते, आणि रस्त्यामध्ये बायकांचे व पुरुषांचे थवेच्या थवे जमून मोठा आक्रोश करीत होते. रावसाहेब यांचे प्रेत दहन करून लोक मागें फिरले तेव्हां त्यांस असे वाटले कीं, बडोद्यांतील दया, औदार्य, सौजन्य आणि विनय हे देखील आपण त्या सत्पुरुषाच्या प्रेताबरोबर दहन करून परत जात आहोत. मरणापूर्वी रावसाहेब यानीं त्यांचे सहोदर बंधु माधवराव यांचे जेष्ठ पुत्र यशवंतराव यांस दत्तक घेतले. या गोष्टीस मल्हारराव महाराज यांची विलक्षण प्रतिकूलता होती. त्यानीं आपली अनुमती देण्याबद्दल मनस्वी नजराणा मागितला होता, आणि शेवटी पांच लक्ष रुपये रोख आणि पांच लक्षांची लोकांकडील उघराणी सरकारानी बसूल करून घ्यावी, मिळून दहा लक्ष रुपये देण्याचे कबूल केले, तेव्हां त्या दत्तविधानास मल्हारराव महा- राज यानी मान्यता दिली.*

  • राजा सर टी. माधवराव यानीं यशवंतराव गत झाल्यानंतर त्यांचे सापत्न बंधु गंगाधरपंत ऊर्फ

बापा साहेब यांस दत्तक कबूल केलें, तेव्हां त्यांजपासून पूर्वीचे दहा लक्ष रुपये रोख घेऊन, त्यांचे दत्तकाबद्दल आणखी कांहीं रकम नजराणा घेतली आहे. अमुक लोकांकडे आमचे पांच लक्ष रुपये घेणें आहेत ते सरकारानीं वसूल करून घ्यावे असा करार असून त्याप्रमाणे रिणको पासून लिहून घेतलेले दस्तऐवज दरबारांत देऊन निकालांत आणिले असतां, ते दस्तऐवज बापासाहेब यांस परत देऊन सर्व रक्कम रोख घेतल्यानें यांच्या पेढीला मोठी जोखम लागली आहे, आणि या घराण्याची अनु कशी राहील याविषयों मोठी पंचाईत पडली आहे. दरवारांतन लोकांस पैसा देण्याची आणि लोकांपासून पैसा घेण्याची राजा सर टी. माधवराव यांचीं मानें अगदी निरनिराळी आहेत.