पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभाराची नवीन व्यवस्था. (४५) असे सांगतात कीं, ते दक्षिण देशांतून पन्नास हजार रुपये घेऊन बडोद्यास आले आणि मैराळ नारायण या नांवचे बडोद्यास दुकान घातले. शिलेदार लोकांस कर्ज देण्याचा व्यापार ते करीत होते. या देवघेवींत त्यांस पुष्कळ पैसा मिळाला आणि यामुळे ते गायकवाडास लाखों रुपये कर्ज देण्यास समर्थ झाले. मैराळ भाऊ हे फार कृपण होते यामुळे लवकरच त्यांजपाशीं पुष्कळ द्रव्य जमा झाले. त्यांची वर्षाची प्राप्ति लाखों रुपये असून त्यांचा एकंदर खर्च दहा हजारांपेक्षां ज्यास्त नव्हता असे म्हणतात. व्याजाचा दर भारी. शिवाय मनोती, शिरपाव वगैरे बावती शिलेदार लोक देत असत. त्याखेरीज सरकारी महाल इजाऱ्याने ठेवीत, त्यांत त्यांस मनस्वी नफा मिळत असे. मैराळ भाऊ यांस पुत्रसंतान नव्हते. एक कन्या होती तीही विधवा झाली होती, सबब त्यानीं मरणापूर्वी आपल्या गोत्रपुरुषपक रामचंद्रपंत यांचे दुसरे चिरंजीव गोपाळराव यांस दत्त घेतले. त्या समयीं रावसाहेब यांचे वय पांच किंवा सहा वर्षांचे होतें. हा भाग्यशाली पुरुष या घराण्यांत आल्यापासून त्या घराण्याची कीर्ति प्रसृत होण्यास आरंभ झाला. हरबाजी महिपत आणि हरबाजी खंडेराव हे दोन कर्ते पुरुष त्या वेळेस या घराण्याचे कारभारी होते. त्यानीं भैराळ भाऊचे उत्तरकार्य पुष्कळ रुपये खर्च करून केले, आणि संपत्तीच्या मानाप्रमाणे दान, धर्म करणे वगैरे गोष्टींची उत्तम व्यवस्था केली. औदार्य हा रावसाहेब यांचा नैसर्गिक गुण होता, आणि त्यांच्या वडिलांनी विपुल संपत्ति एकत्र करून ठेविली होती, तिचा ते सद्विनियोग करूं लागतांच, लोकांत त्यांची कीर्ति पसरली. संपत्ति, औदार्य आणि सत्पात्रों दान करण्याची बुद्धि, या तिन्ही गोष्टी रावसाहे- ब यांस अनुकूळ होत्या. दानधर्माविषयीं व वैभवाविषयों गोपाळराव मैराळ हे राजाची दुसरी प्रत होते. सर- कारांतून ज्याचा सत्कार झाला त्याचा रावसाहेब यांजकडून व्हावयाचाच. रावसाहेब यांचा स्वभाव फार सौम्य होता. आगत स्वागत करण्याची त्यांची रीत फार लीनतेची व प्रौढतेची असे. या सत्पुरुषास दया तर इतकी होती की, एकादा दुःखी मनुष्य पाहिला म्हणजे त्यांचे अंतःकरण मनस्वी द्रवत असे. लोकांत जसा त्यांचा मान होता तसाच दरबारांतही होता. सयाजीराव महाराज त्यांस फार चहात होते. कोणीही परकीय शिष्ट गृहस्थ बडोद्यास आला म्हणजे त्याचा सत्कार रावसाहेब यांज- कडून व्हावयाचाच. मग तो मोठा असो किंवा साधारण असो. विद्वान ब्राम्हणाचें तें तर माहेर घरच होते. त्यांच्या मनीषा रावसाहेब मोठ्या संतोषाने तृप्त करीत. रावसाहेब यांचा विनय फारच अनुपम होता. लहानापासून मोठ्या पर्यंत जो कोणी त्यांच्या भेटीस जाई त्यास त्यांच्या विनयापासून अतिशय समाधान होत असे, आणि मोठ्या शठास देखील त्या मूर्तीचें दर्शन झाले ह्मणजे त्यांच्या पायावर मस्तक ठेवण्याची बुद्धि होई.