पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. नामदार फर्ग्यूसन साहेब बहादुर बडोद्यास गेले होते. त्यांनी महाराजांस अधिकार दिला त्यावेळेस त्यांस जो उपदेश केला तो फारच उत्तम आणि मनोवेधक आहे. या समारंभास पुष्कळ यूरोपियन आणि देशी गृहस्थ बडोद्यास गेले होते, माणि यां चा यथायोग्य सत्कार करण्यांत आला. ● महाराजांस अधिकार देतांना त्यांच्या सत्तेस कांहीं मर्यादा करावी असा ऊह नि. घाला होता; परंतु लार्ड रिपन् साहेब बहादुर यांनी महाराजांस आपला राज्यकारभार चालविण्यास पूर्ण स्वातंत्र्य देऊन गायकबाडांबरोबरील तहनामे आणि कौल करार समग्रतेनें कायम ठेवले. येणे करून त्यांजविषयी हिंदुस्थानांतील लोकांत पराकाष्ठेची पूज्यबाद्धे उत्पन्न झाली आहे. दोन वर्षेपर्यंत दिवाण साहेब आदिकरून कारभारी मंडळी यांच्याच सल्यांनी महाराजांनी राज्यकारभार चालवावा असे ठरले हेंही फार उत्तम झालें. ही प्रधान मंडळी महाराजांची आणि राष्ट्रांची परम हित इच्छिणारी आहेत, आणि त्यांच्या विचारे राज्यकारभार चालविण्यांत महाराजांचें व राष्ट्राचे परम मंगळ आहे. 7 महाराजांनी राज्यसूत्र हातांत घेतळें त्या दिवशी एक नाहिरनामा प्रगट केला तो खाली लिहिल्याप्रमाणे :- जाहीरनामा. "श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड सेनाखास खेल "समशेर बहादूर फरजंद ए खास ए दौलत ए इंग्लिशिया. J “सर्व लोकांस प्रसिद्ध व्हावें कीं, आज मित्तीपासून बडोदे राज्याचा अधि "कार आह्मी आपले हाती घेतला आहे. "आमची मजा सुखी रहावी व दिवसें दिवस तिच्या कल्याणाची वृद्धेि व्हावी “अशी आमची अंतःकरणापासून इच्छा आहे- "नामदार इंग्रेजसरकारच्या स्नेहाने व साह्याने हा हेतु सिद्धीस नाईल व तो "सिद्धीस नेण्यांत आमचे सर्व कामदार, सरदार व दरकदार लोक व सर्व प्रजा “राजनिष्ठेनें वर्ततील असा आह्मी भरंवसा राखितों. "आज आरंभिलेले कार्य ईश्वरी प्रसादानें सफळ होवो." गायकवाडी स्थापन झाल्यापासून राजानें आपल्या प्रजेस पहिल्याने जी सनद दिली, ती हीच. या नाहिरनाम्याची रचना थोडक्यांत फार उत्तम केली आहे. महाराज आपला राज्यकारभार कोणत्या धोरणानें चालविणार याविषय ह्यांत स्पष्टीकरण होऊन व महाराजांच्या सत्तेचें सहाजीक नियमन झाले असून सरदार व दरकदार लोक यांच्या अधिकारांची कायमी झाली आहे, व त्यांस नव्या विचाराच्या कारभारापासून ने कांहीं