पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३८१) ळ्या समोरून घेऊन जातात; त्यापेक्षां मुळींच संपत्ति नसावी हे चांगलें नाहीं कां ? मोठे जे आहेत त्यांच्या कृांत अंतर्गत फायदे फार असतात आणि ते आपणास कळत नाहीत असे मानण्याखेरीज दुसरे साधनच नाही. त्यांच्या कारभारांतील काही दोष एकीकडे ठेऊन विचार केला म्हणजे सांजपासून बडोद्याचे राष्ट्राचे पुष्कळ प्रकारचें हित झाले आहे. मनुष्याचें मन आणि शरीर चांगले असले झणजे त्यांस सर्व कांहीं सुखें मिळवितां येतात. दिवाण साहेब यांनी शाळा स्थापन करून मन आणि औषधालये स्थापन करून शरीर चांगले ठेवण्या विषय लोकांस उत्तम प्रकारचे साधन करून ठेविले आहे. दुसरें न्यायाची व्यवस्थ उत्तम केली असून, पोलीसचा बंदोबस्त चांगला आहे. श्रीमंतापासून गरिबाचें आणि बळकटापासून निर्बळाचें संरक्षण होतें. सरकारांत नजराणा देऊन आपल्यावर कोणी अन्यायाचा हुकूमनामा मिळवील याविषयी लोकांस भय राहिले नाहीं. जमिनीत किती जरी उत्पन्न झाले तरी ठरलेल्या साऱ्यापेक्षा आपल्यापाशी कोणी जास्ती मागेल अशी शेतकरी यांस शंका राहिली नाहीं, आणि दिवाण साहेब यांच्या कृपे- तील कामदार लोकांस बडोद्याचें राज्य एक सुखाचें माहेर घर बनून राहिले आहे. सरदार दरकदार वगैरे लोकांची अशी समजूत झाली आहे की, आपल्यावर अतिशय विपत्ति पडूं न देतां जे काही होणे तें विचारपूर्वकच होईल. सारांश संतती, संपत्ति, विद्या, वपू, यश, आणि कीर्ति, यहींकरून युक्त असा भाग्यशाली पुरुष सर टी. माधवराव साहेब यांजवेरीज दुसरा क्वचितच सांपडेल. बडोद्याचा राज्यकारभार चालवून त्यांनी ने यश मिळविले आहे तें हिंदुस्थानवासी लोकांचें समाईक यश आहे असे समजले पाहिजे. • आतां श्रीमंत सदाजीराव महाराज यांच्याविषयी थोडेंसें लिहून हा ग्रंथ पुरा करतों. महाराजाही ईलियटसाहेब यांच्या शिक्षणाखाली उत्तम प्रकारचा विद्याभ्यास करून बडोद्याचा राज्यकारभार स्वतंत्रपणे चालविण्यास आपण सर्वोपरी पात्र आहोत असे लौकरच लोकदृष्टीस आणिलें. श्री० महाराणी जमनाबाई साहेब यांची कन्या श्री० सौ० ताराबाई साहेब यां चें लग्न सांवतवाडीचे राज् सरदेसाई यांजबरोबर तारीख ३१ डिसेंबर सन १८७९ रोजी झालें. आणि श्री० महाराजा यांचे लग्न तंजावरच्या घराण्यांतील कन्येयरोवर तारीख जानेवारी सन १८८० रोजी झाले. श्री० सौ० राणीसाहेब यांचें नांव चिमणाबाई ठेविले आहे. हे दोन लग्नसमारंभ फार मोठ्या थाटाने होऊन लक्षावाघे रुपये खर्च झाले; परंतु ब्राह्मणभोजन इत्यादिक कृत्यांकडे जुन्या चालीप्रमाणे खर्च न के राजा सर टी. यांनी आपल्या उज्वल यशास थोडा कलंक लाऊन घेतला असे लोकांचें ह्मणणे आहे. तारीख २८ डिसेंबर सन १८८१ रोजी महाराजा यांस राज्याधिकार देण्याच समारंभ झाला. या समारंभास नामदार गवरनर जनरल साहेब बहादूर यांच्या तर्फे