पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. 66 'गाइकवाड सरकारास जे सल्ला देणारे आहेत त्यांत बळवंतराव राहुरकर महाराजांचे खानगी सलेंत व दुसऱ्या कितीएक बाबतीत त्यांचा विशेष अंमल आहे, परंतु दरबार संबंधी इंग्रज सरकारच्या संबंधाच्या ज्या गोष्टी आहेत त्यो त्यांच्या सल्ल्याने होत नाहीत, त्या मुख्य दिवाणांच्याच सल्ल्याने होतात असे मला माहीत आहे. दिवाणानी किंवा दुसरे कामदार मजकडे येतात त्यांनी असे सांगितले नाहीं कीं, बळवंतराव शहुरकर यांचा अंमल वाईट प्रकारचा आहे. ते म्हणतात की, तो चांगले अंतःकरणाचा व सुस्वभावाचा मनुष्य आहे, व माझे स्वतःचे अनुभवावरून मी म्हणतो की, त्याचे विरुद्ध सांगण्यांसारखी एकही गोष्ट मला आढळली नाही, किंवा गाइकवाड सरकारानी जो त्याजवर सर्वस्वी भरंवसा ठेविला आहे त्यापासून एकही गोष्ट वाईट झाली असे मला माहित नाहीं, परंतु कारभाराचे बाबत मात्र तो बिनवाकबगार आहे. आणखी मला असे कळले आहे कीं, हा महाराजांचा फार जिवलग दोस्त असल्यामुळे माजी गायकवाडांनी त्यास त्या उभयतांमध्ये ज्या समयीं वैमनस्य झाले त्या समयी बडोद्यांतून काढून दिले होतें. हल्लींचे महाराज गादीनशीन झाल्यावर बळवंतराव वडोद्यांत आ ले, आणि त्यांस महाराजांनी मोठे आनंदाने भेटून त्या वेळेपासून तो त्यांच्या कृपेंत इतका वाढला आहे की, तें मजला आफिसचे रीतीने कळले नाहीं, परंतु ऐकण्यांत आहे की, त्यास महाराजांनी नायब दिवाणाचा हुद्दा दिला आहे व महाराजांची हीच मोठी इच्छा आहे की, त्यांस रेसिडेंट साहेब यांनी कबूल करून रेसिडेंसींत फालमीचा मान द्यावा. ही गोष्ट मी ऐकली त्यास मी कोणतेही प्रकारें कारण झालों नाहीं, व बळवंतराव याचा व माझा रेसिडेंटाच्या नात्याने, अगर दुसऱ्या नात्याने अझून भेट किंवा लेखी संबंध नाहीं. ही जी गायकवाड सर- कारची त्यांची बाळपणाची दोस्ती व सुखदुःखाच्या गोष्टी आठवून महाराज त्यांजवर प्रीति करितात हा एक महाराजांचा सद्गुण समजला पाहिजे.” * बळवंतराव राहुरकर यास नायब दिवाण नेमिल्यानंतर लवकरच गोपाळराव मैराळ यांस दुखणे लागले, आणि पांच सात महिन्यांनी ते गत झाले. मला वाटतें कीं, गोपाळराव मैराळ यांच्या प्रसिद्ध घराण्यासंबंधी जी मला साधारण माहिती आहे ती येथे थोडक्यांत निरूपण केली असतां निरर्थक होणार नाहीं. राजकुलोत्पन्न पुरुषांचा त्या राज्याच्या इतिहासाशी जसा निकट संबंध असतो, तसा रावसाहेब यांच्या घराण्याचा बडोद्याच्या राज्याशीं होता, म्हणून त्या सत्पुरुषाचे चरित्र लोकांस कळावे, हे चांगले आहे. मैराळ नारायण ज्यांस भाऊ साहेब म्हणत ते या घराण्याचे मूळ पुरुष धरून त्यांच्या पासून या घराण्याची हकीगत सांगितली पाहिजे; कारण या घराण्यांतील मोठ्या संपत्तीचे संपादक काय ते तेच होते.

हे मराठी भाषांतर माझे नाहीं. भाषांतर केलेला रिपोर्ट मला कोणी दिला त्यांतील हे कलम जसेंचें तसे घेतले आहे.