पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. द्रव्य मुइँत पुरून ठेवण्यापेक्षां त्याचा प्रसार केल्यापासून सर्व लोकांचे हित होतें. 1 राजा सर टी. माधवराव साहेब यांस बडोद्याच्या राष्ट्राचें हित पाहण्यासाठी ब- डोद्याचे दिवाण नेमळे होते किंवा राष्ट्रांचे नुकसान करून इंग्रज सरकारचें हित कर- ण्याकरितां. देशी राजे इंग्रेज सरकारच्या सामर्थ्यापुढे किती नेरीस आले आहेत, हे सर्वांस माहीत आहे. त्यांच्या नाकांत आणखी एक नवी वेसण घालून त्याची दोरी बळिष्ठाच्या हातांत देणे योग्य नव्हते. देशी राजांच्या राज्याच्या अस्तित्वाचा पराका- ष्ठेचा कंटाळा असे गवरनर जनरल या हिंदुस्थानांत येऊन गेले आहेत. आणि तशा विचाराचे लोक आज नाहीत असेही सांगू शकत नाहीं. तेव्हां देशी राजांच्या सर्व नसा इंग्रज सरकाराच्या हातांत देणें हैं कांहीं त्यांच्या अस्तित्वास सुरक्षित नाही. अशी कल्पना करा कीं इंग्रज सरकारानीं सर्व देशी राजांस असे सांगितले कीं, तुझी आ मच्या बरोबर नेहमीं एक निष्ठेने वागाल अशी आमची खातरजमा होण्याकरितां, अमुक द्रव्य हामीचदल ह्मणून आमच्या तिजोरीत ठेवा तर अशा प्रसंगी देशी राजांचे आपण दिवाण या नात्याने सर टी. माधवराव यांनी असे का केले पाहिजे होते ? हा विचार मनांत आणिला ह्मणने बडोद्याचे रुपये ब्रिटिश सरकारच्या सत्तेत ठेवणे बती एक प्रकारची एकनिष्ठपणानें रहाण्याबद्दल हामी दिली आहे, असे सुच विणे किती अनुचित कृत्य आहे ते ठळक दिसून येतें. गायकवाड इंग्रज सरकारशि पराकाष्ठेच्या इमानाने वागतात व इंग्रज सरकारची सबसिडियरी फौज व रोसडेंट ब ● डोद्याच्या अंगणांत दाब घालण्याकरितां तळ देऊन पडले आहेत, त्याहून देखील बळकट हामी दिली पाहिजे होती, असें दिवाण साहेब यांस वाटलें. बडोद्यांत व्यापार अगदी बुडाला, सावकारांचों दिवाळ्यावर दिवाळी निघतात, जो पैसा राष्ट्रांत फिरत होता तो परराष्ट्रांत नेऊन टाकल्यामुळे, लोकांस व्यापाराची उलाढाली करण्याचे साधन राहिलें नाहीं. तरी बडोद्याचें राज्य उन्नत दशेस येत आहेच में एक विल क्षण कौतुक आहे. या रितीनें एकाच 1 बाजूने पाहिले झणजे बडोद्याच्या राष्ट्राचे फार नुकसान झाले असे वाटतें. परंतु दुसऱ्या बाजूने पाहिले असतां दिवाणसाहेब यांनी बडोद्याच्या राष्ट्रावर एक प्रकारचा अनुग्रहच केला असे दिसतें. द्रव्यापासून किती अनर्थ उ द्भवतात हें सर्वांस माहीत आहे. त्यापासून नाना प्रकारची दुर्व्यसने लागतात, ग्राभ्य विषय सेवन करण्याची बुद्धि होते, गोड खावेसे वाटतें, मद्य प्यावेसे वाटतें; दरिद्री श्रम न करितां त्यास घोड्यावरून व गाडींत बसून फिरावेसे वाटतें; त्या योगानें व्यायाम कमी होऊन शरीर दिवसानुदिवस क्षीण होतें, आणि अकालीच मृत्यूची गांठ पडते; साह. स करून द्रव्य अधिक वाढविण्याची इच्छा होते, त्या पासून नाना प्रकारचे वाद उ. त्पन्न होतात, त्याबद्दल कोटांत फिर्यादी कराव्या लागतात; त्यांत पराजय झाला तर मन खिन्न होऊन त्यापासून शरिरावर वाईट परिणाम घडतात; व्यापारांत जोखम ला- गली झणजे दिवाळे निघते आणि मग सावकार लोक आपली संपत्ति आपल्या डो.