पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार, (३७९) दोन थेंब एका प्यालामर पाण्यांत टाकले तर तें सगळें पाणी जसें तांबड़े होते, मा प्रमाणे राष्ट्रांतळा पैसा राष्ट्रांत खर्च केल्यानें, किंवा व्यापारांत लावल्याने परिणाम होतो. एकाच व्यक्तीला उधळेपणाची नेमणूक करून दिली तर तो पैसा देखील त्या केशराच्या रंगाच्या दोन थेंबांप्रमाणेच सर्व राष्ट्रांत मसत झालेला दृष्ट होतो. मग सद्विनियोग केल्यानें त्यापासून राष्ट्राला किती उपयोग होईल हे निराळे सांगणे नको. या संबंधानें राजा सर टी. यांचा राज्यकारभार त्यांस सुयशस्कर झाला नाही. त्यांच्या कारकीर्दीत बडोद्याच्या राष्ट्राचा पैसा बाहेर जाऊन जे शाश्वत नुकसान झाले आहे, तें आतां कधीं ही भरून काढतां येणार नाहीं. मोठचा मोठ्या पगाराचे जितके कामगार तितके सगळे विदेशी. त्यांनी जो पैसा बडोद्याच्या राष्ट्रा बाहेर पाठ विळा व पाठवितील त्यांपैकी एक दमडी देखील परत घेऊन त्यापासून बडोद्याच्या लोकांस कांहीं देखील उपयोग व्हावयाचा नाहीं. त्यांत दिवाण साहेब यांनीं प्रामिसरी नोटींमध्ये जो पैसा गुंतवून ठेवलेला आहे, त्यामुळे तर राष्ट्राचें पराकाष्ठेचे नुकसान झाले आहे. सन १८७९-८० या अखेरीस एक कोट बारा लक्ष बावीस हजार रुपयांच्या नोटी खरेदी घेतल्या होत्या. पहिल्याने त्यांचा संकल्प असा होता की पाऊण कोट रुपये ब्रिटिश सरकारच्या हमीवर ठेवून मग जी शिलक राहील ती लोकोपयोगी कामी लावावी, परंतु तो विचार फिरला. त्यानंतर त्यांनी आज पर्यंत किती नोटी खरेदी केल्या असतील त्या असोत. शरिरात रक्ताच्या लक्षावाध नद्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहिल्याने जसे प्राण्याचें सरंक्षण होतें, त्याप्रमाणें राष्ट्रांतील पैसा राष्ट्रांतच लक्षावाघे मार्गाने फिरळा पाहिजे. तो जर दुसऱ्या राष्ट्रांत नेऊन ठेवळा तर एका प्राण्याच्या शरिरा रक्त दुसऱ्या प्राण्याच्या शरिरांत नेऊन ठेवल्यानें जो परिणाम व्हावयाचा तोष त्यापासून व्हावयाचा. आपल्या कृतीपासून बडोद्याचे फार नुकसान झाले आहे, यसे का त्या चाणक्ष पुरुषास कळत नाहीं ! ! पण इंग्रज लोकांची मर्जी खुष ठे. वण्याकडे त्याचे लक्ष असल्यामुळे हा घातक परिणाम झाला आहे. अशा रितीनें ऐवजाची व्यवस्था करण्याची कारणे त्यांनी सांगितली आहेत त्यांत संकटकाळी राजास द्रव्याची अपत्ति पहूं नये हैं एक असून त्याखेरीज दुसरी कारणें सांगितली आहेत तीं ह्रीं:- ह्या द्रव्यापासून ब्रिटिश सरकारास परंपरेने कमी अथवा जास्त फायदा होत आहे. नेटीव राजांनी ब्रिटिसरकारच्या हामीवर पैका ठेवणें, हें ब्रिटिश सरकार- वे राज्य न्यायी व टिकाऊ आहे असा एक पुरावा आहे. .देशी राजांनी इंग्रज सरकाराबरोबर नेहमी इमानाने बागावें याविषय ही एक ऐवजदार हमी आहे. या योगानें व्यवहारांत ब्रिटिश सरकारच्या हमीची किंमत वाढते. आणि,