पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. माणे पुराव्याचे अवयवच्छेद केले तर मग गोष्ट निराळी. पण पागेच्या बारगिरांत देखील हजारों लोक वंशपरंपरेचे चाकर आहेत. त्यांची मुळे लहान असली तर स रकार त्यांचें पालन करून, मोठे झाल्यावर त्यांच्या बापाच्या बारगिया त्यांस देतात. अपुत्रिक विधवेचें सरकार पालन करतें मग सरदार लोकांच्या सरदाप्या वंशपरंपरेनें चालत असतील, यांत तें नवल काय ? मोठ्या घराण्यांत तर दत्तकाची परं पराच चालत आली आहे. माजी राजांचें कृत्ष दिवाणसाहेब यांच्या " विचारास अनुकूल असलें ह्मणजे त्यांस मनुस्मृति प्रमाणे योग्यता येते. आणि प्रतिकूळ असले ह्मणजे तें छांदिष्टपणाचें आणि राजाच्या कर्तव्य कर्मा पलीकडे ठरून अगदीं अननुसरणीय होतें. देशी राजांचा राज्यकारभार पराकाष्ठेनें शिस्तवार नसतो, हे एक त्यांस उत्तम साधन सांपडले आहे. जी बाजू त्यांनी स्विकारिली त्या बद्दल त्यांस काहिना कांहीं तरी मागील वहिवाटीचे प्रमाण मिळते. आणि यामुळे त्यांस आपला राज्यकारभार अगदी आपल्या इच्छेप्रमाणे चालविण्यास काहाँ हरकत पडत नाहीं. खर्चाच्या बाबतीत असामदार वगैरे लोकांच्या नेमणुकीबद्दल व देवस्थान धर्मा- दायाबद्दल जी रकम खर्ची पडते त्याजवरही त्यांचा कटाक्ष आहे. दरबारांतून ज्यास वंशपरपराच्या जहागिरी, इनाम, व वर्षासनें, व असाम्या चालतात साविषयी त्यांचे विचार असे आहेत कीं, अशा रितीनें राजद्रव्याचा व्यय केला तर लोकोपयोगी कामाकरितां द्रव्याचा विनियोग करण्याची सवड मिळावी कशी ? हे त्यांचे ह्मणणें मोठे रमणीय दिसते. पण दक्षिण महाराष्ट्र देशांतील जहागिरदार व इनामदार यां- च्या मिळकती खालसात केल्या त्यापासून महाराष्ट्र देशाला व देशी राजांचीं राज्ये बुडविल्यापासून हिंदुस्थान देशाला जितकी उन्नति आली तितकीच वंशपरंपरेच्या 'नेमणुका कमी केल्याने बडोद्याच्या राष्ट्रास यावयाची यांत काही संशय नाहीं. आज आपल्या लोकांस इनाम, जहागिरी, असाम्या, वर्षासने, मिळविण्याच्या जागा कायत्या देशी राजांचीं राज्यें. त्यांत देखील नव्या मन्वंतराप्रमाणे नव्या जहागिरी वगैरे मिळणे कठीणच आहे. परंतु ज्या कांहीं जुन्या आहेत, त्यांही निर्मूळ झाल्या- तर देशी राजांच्या राज्यापासून जो एक प्रकारचा फायदा आहे, तो नष्ट होऊन देशी राजांच्या राज्यांतील अमिरी मुळांतून नाहींशी होईल. प्रत्येक सरदार व दरक- दारव दुसरे बडे लोक हे प्रत्येक संस्थान आहे, असे आज पर्यंत बडोद्याच्या रा. जांनी व कारभाऱ्यांनी मानून त्यांचा उत्तम रितीनें परिपाळ केला. त्यांच्या आश्रया सजीं कांहीं मनुष्य आहेत तीं तरी बडोद्याचीच प्रजा आहे, तेव्हां परंपरेनें ह्या वि. नियोगापासून प्रजेचेंच हित आहे. कै० सयाजी बोवा यांस तर आपल्या आश्रितांचा पराकाष्ठेचा अभिमान होता. तो कित्ता घेऊन व राजा सर टी माध- वराव साहेब यांचे जे उपयुक्त विचार आहेत ते त्यांत मिश्र करून राज्यकारभार चालविला तरच बडोद्याच्या प्रजेस अनुपम सुख होईल. पदार्थाच्या अंगीं विभाजत्व ह्मणून एक धर्म आहे. आपण जर केशराच्या रंगाचे