पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार (३७५ ) कारची जमा वसूल करणारा होता, तर त्यानें वसूल केलेली रक्कम कायती सालीना ९४ लक्षाचीच कां ? आणि प्रत्यक्ष राजधर्मानें वसूल केलेली रक्कम पूर्वीच्या जमा- दीत बारालक्ष सट देऊनही एकशे एकतीस लक्षांची कां? आणि मल्हारराव महाराज याचे कारकीर्दीत प्रजा दुःखी कां ? आणि राजा सर टी. माधवराव यांच्या कारकी दींत सुखी कां ? याविषयी खरी हकीकत अशी आहे कीं, कर्नल फेर यांची मल्हा- रराव महाराज यांस पराकाष्ठेची प्रतिकूळता असल्यामुळे, व मल्हारराव महाराज याचां राज्यकारभार पराकाष्ठेचा अव्यवस्थित असल्यामुळे, आह्मावर पराकाष्ठेचा जुलम होत आहे, अशी हाकाहाक करण्यास प्रजेस सवड झाली आणि तिनें वास्त विक सरकार देणे देण्याचें देखील वर्ज केलें. कर्नल फेर यांचे तीस पाठबळ होतेच आणि सर रिचर्ड मीड यांचें कमिशन जमिनीवर पराकाष्ठेचा सारा वाढला आहे, असा अभिप्राय देण्यास तयार होतेच. मग प्रजा तरी वास्तविक देणे देईल कशाला? अगदीं निष्पक्षपातानें पाहिले तर मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत प्रजेच्या घरांत जितका पैसा राहिला, तितका कोणत्याही कारकीर्दीत राहिला नाही. कारण की, सरकारचें देणें तीस जितकें योग्य वाटले तितकेंच तिनें दिले. त्याचप्रमाणे खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत सवत १९२३ पासून रयतेकडे बाकीच राहत गेली. कागदी जमा कर्धीही वसूळ आली नाहीं. असे असून प्रत्यक्ष बलात्कार हा सरकारी जमेचा वसूल कारणारा अर्शी दुष्ट विशेषणे देऊन या बडोद्याच्या राज्य- कारभाराचा खरोखर विशेष बभ्रा केला आहे. खानबहादूर काजी शहाबुद्दीन हेच मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत महालनिहाय सरसुभे होते, परंतु कर्नल फेर. घ्या हिमायतीमुळे प्रजा त्यांस अगदी अनावर झाली होती. फार तर काय पण कर्नल फेरच्या अंमळांत प्रजेस निमे सूट देऊन देखील जे यश मिळवितां आले नसते, ते दिवाण साहेब व काजीसाहेब यांस बावन्न लक्ष रुपये जास्त घेऊन मिळवितां आले. तस्मात् त्याचें भाग्यच मोठे यांत संशय नाहीं. आतां मल्हारराव महाराज यांची राज्यकारभारांतील अव्यवस्था आणि कर्नल फेर यांची प्रतिकूलता जमा वसूल न येण्यास, आणि दिवाणसाहेब आदिकरून प्रधान मंडळीची सुव्यवस्था आणि मे लव्हील साहेब यांची अनुकूलता जमेच्या वसूलास कारण आहे हे खरें. परंतु नव्या अबादी. पासून दोन वर्षांत इतकें उत्पन्न वाढलें अशी कोणी कल्पना करूं नये. ज्या ज मिनी लागवडीस होत्या त्यावरील साऱ्यांचेच हें उतन्न असून नव्या लागवडीबद्दल दोन लक्षांहून अधीक उत्पन्न नाहीं. आतां आपण राजा सर टी. यांनी राजद्रव्याचा विनियोग कोणत्या प्रकारें केला, त्याचा थोडासा विचार करूं. बडोद्याच्या दरबारचा पूर्वी खर्च काय होता, आणि हल्लीं कोणत्या खात्यांत किती कमी किंवा जास्त खर्च होत आहे हे काहीं त्यांच्या रिपोर्टावरून समजत नाहीं. सन १८७९-८० सालाचा त्यांचा रिपोर्ट शेवटचा आहे त्यात त्यांनी एकंदर खर्च एक कोटी अठरा लक्ष बेचाळीस हजार नऊ एकवीस रुपये लिहिला असून