पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७४ ) मल्हाररात्र महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ठून? त्यावरून उघड असें होतें कीं, राज्याची पैशासंबंधी पहिली स्थिति निराशपण परिक्षण होती, हे वृत्त अगदीं चुकीचे आहे. माजी राजांनी पराकाष्ठेचा उधळेपणा व अपव्यय करून ही एक कोट पंधरा लक्ष रुपये बडोद्याच्या तिजोरीत शिळक होते यांत कांहोंच संशय राहत नाही. मग चाळीस लक्ष रुपये सर लुईस पेली यांनीं शोधून काढले, आणि पासष्ट लक्ष रुपये आकाशांतून उतरले अर्से कां ते ह्मणतनात? सारांश पैशाच्या संबंधाने बढोद्याच्या राष्ट्राची पूर्वीची स्थिति मरभराटीची होती याविषयी तिळमात संदेह मिळून नाहीं. . आतां राज्याची पूर्वीची जमा काय होती आणि राजा सर टी. माधवरावसाहेब यांच्या कारकीर्दीत तिजमध्ये किती वृद्धि झाली हे आपण पाहू. दिवाण यांच्या पहिल्या रिपोर्टात मागील वर्षांच्या उप्तन्नाचा आंकडा दिला नाहीं त्याचें कारण ते असे सांगतात कीं, मागील हिशेष मिळून मुळींच नाहींत. खरेंच आहे; ब्रह्मघोळ यांजकडे हिशेब ठेवण्याचे काम होतें, तेव्हां मागीळ जमा आणि खर्च काय होता याविषयीं त्यांस माहिती कोठून होणार ? परंतु ब्रह्मघोळाने राजा सर टी. यांस एक प्रकारचें सहायच केले आहे. एकतर त्यांस आपल्या कार- कीर्दीतील जमा वाढवून सांगतां येते; आणि कितीही खर्च वाढविला तर तो मर्यादे बाहेर गेला अर्से कोणास ह्मणण्यास जागा नाहीं. अस्तु. सर लुईस पेली यांनी म ल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील राज्याचें उत्पन्न सालोना ९४ लक्ष आणि खर्च एकशे एका हत्तरा पेक्षा कमी नाहीं असे दाखविले आहे. राजा सर टी. यांनी सन १८७५-७६चे उत्पन्न किती झाले हैं दाखवि- लें नाहीं. पण सन १८७६-७७च्या साळांत एकशे दहा लक्ष रुपये उत्पन्न होईल असा अदमास केला असून एकशे तेहेतीस लक्ष पसतीस हजार नऊशें एके. चाळीस रुपये उप्तन्न झाले आहे. अजमासापेक्षां तेवीस लक्ष जमेत वाढ काय!! यावरून मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील उत्पन्नापेक्षा सुमारें चाळी- स लक्षाहून कांहीं अधिक उप्तन्न वाढलें असें होतें. अर्थात् दोन वर्षांच्या अवधीत इतकी जमा वाढेल कशी याविषयीं मनांत शंका उत्पन्न होणे हें स्वाभाविकच आहे.. त्यांत आणखी जमिनीवरील साऱ्यांत बारा लक्ष रुपये सूट देण्यांत आली आहे, असे मेळव्हिल साहेब यांनी सन १८७५-७६ सालाच्या रिपोर्टातील ४४व्या कलमांत लिहिले आहे. ती रक्कम ९४ लक्षांतून वजा केली आणि बाकी राहिलेली रक्कम एक- शे तेहतीस लक्षांत वजा केली ह्मणजे पहिल्या उप्तन्नापेक्षां बावन्न लक्षांहून अधिक उप्तन्न राजा सर टी. यांच्या कारकीर्दीत वाढले असें होतें, आणि तसे होणें तर अगदीं शक्य नाही. सर लुईस पेली यांनी बडोद्याच्या राज्याचा चार्ज घेतला तेव्हां तिजोरींत काय ते दोन हजार रुपये होते. आणि मग कांहीं दिवस झाले नाहीत तों. च साठ लक्ष झाले, यांत जसें कांहीं विलक्षण गूढ आहे तसेंच या उप्तन्नाच्या वृद्धीं. तही आहे. यावरून आणखी एक शंका उत्पन्न होते कीं, पूर्वी प्रत्यक्ष बलात्कार जर सर