पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार (३७३ ) स राज्याचा खर्च व आपल्या मोठ्या राज कुटुंबांचें व आभितजनांचे चरितार्थ चाळवून कर्जाची फेड करावयाची होती यामुळे त्यांस जमेवर व खर्चावर फार बारीक नजर ठेवावी लागत असे. के० सयाजी बोवा यांच्या वेळच्या कापडी जामदार खा. न्याच्या रोजकिर्दी काढून पाहिल्या तर त्यांजवरून असे समजून येईल कीं, दाखल्या पेक्षां एक खादीचा रुमाल कोणास जास्त लागला तर तो देखील खुद खाशाच्या परवानगीवांचून मिळत नसे. खाशाची स्वारी शिले खान्यांत मुखमार्जन करीत होती त्यावेळेस अमुक वस्तु अमुकास देण्याविषयों परवानगी झाली असे दाखले रोजकिर्दीत पदोपदीं सांपडतील. याप्रमाणे खर्चाची व्यवस्था होती. दाखल्या पेक्षां जास्ती ह्मणून कोणास कांहीं जरूरी वांचून मिळावयाचेंच नाही. त्या राजास सर टी. माधवराव साहेब पराकाष्ठेचे उधळे क्षणतात. आणि आपल्या कृपेतील मंडळींवर देणग्यांचा वर्षाव करावयास मिळाले झणजे झाळे, भग त्यांस राज्य द्रव्या विषय कांहीं काळजी नसे, असे लोकांस खातरजमेने सांगतात. तर हे तुझांस खरे वाटतें कां ? कर्जाच्या फेडी करता इंग्रज सरकारच्या जामिनकी पासून सयाजी बोवा यांस पराकाष्ठेचा तास झाला तेव्हा महाराजांहीं आपढ़ें खासगीचें सर्वस्व देखील कर्जाच्या फेडीसाठी बाहेर काढलें. यावरून सरकाराच्या जमेविष- यीं माजी गायकवाड बेपरवा होते हें झणणे किती विसंगत दिसतें तें पहावें. जो आपलें खासगत द्रव्य राज्याच्या कर्जाच्या फेडीकडेस लावतो, तो एक लाख रुपये नजराणा घेऊन तीन किंवा चार किंवा ग्रांहून अधिक लक्ष रुपयांचें सरकारच्या जमेत नुकासान करील तरी कसा ? • सारांश बडोद्याच्या राज्यकारभाविषयों दिवाणसाहेब यांच्या पहिल्याच रिपोटत हा मजकूर आहे, यावरून त्यांस पुरती माहिती झाली नव्हती यामुळे ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरस्त झाल्या पाहिजेत. आतां आपण त्यांच्या कारकीर्दीत सरकारच्या जमेची व्यवस्था कोणत्या प्रकारची होती, आणि त्यापासून राष्ट्रास किती उन्नत दशा प्राप्त झाली त्याचा आतां विचार करूं. दिवाणसाहेब यांच्या सन १८७५-७६ सालाच्या रिपोर्टातील मावार्थ असा आहे कीं, त्यांच्या कारकीदींच्या गुदस्त साली बडोद्याच्या राष्ट्रांची पैशा संबंधाने स्थिति निराशपणें परिक्षीण होती. ती त्यांच्या कारकीर्दीत एकदम मरमराटीस आली. त्यांनी पासष्ट लक्ष रुपये तर पहिल्याच साली ब्रिटिश सरकारच्या जामिनगिरींत ठेविले आणि पन्नास लक्ष रुपये तिजोरीत शिलक होते. पुढच्या साली एकशे दहा लक्ष रुपये राज्याचें उत्पन्न होईल आणि एकशे पांच लक्ष रुपये राज्याचा खर्च होईल असा त्यांनी अद मास केला होता. त्यावरून १८७६-७७च्या साळांत पांच लक्ष रुपये शिलक पडेल अशी त्यांची अटकळ होती आणि त्यापूर्वीच त्यांनी वर लिहिल्याप्रमाणे राज्याची शिलक दाखविली आहे. तेव्हां पैशासबंधी पहिली स्थिति निराशपणे परिक्षीण होती हैं जर रखरें मानावें, तर एका वर्षात एकशे पंधरा लक्ष रुपये जमले कसे ? आणि आले को-