पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मंडळाविषयीं सर टी. पांनी जो उल्लेख केला आहे, त्याबद्दलची माहिती फडणी स घांजकडून किंवा त्यांच्या कारकुनाकडून मिळाली असेल असें संभवत नाही. कार ण जे दोष त्यांच्याकडून, त्यांच्या पूर्वजांकडून व त्यांच्या कारकुनाकडून कर्धीही घडळे नाहीत, त्याविषयी ते अशी बातनी देतील कसे ? अर्थात् ही माहिती कोणी तरी अप्रयोजक मनुष्यानें दिली असावी असे वाटतें. ज्याच्या हातांत सत्ता आहे त्याचे अवडते होण्याकरितां मनुष्य काय करील याचा कांहीं नेम नाहीं. हल्लींच्या महाराजांस सन्मार्ग लागावा यासाठी ह्या खऱ्या गोष्टी अगदीं उघड करून सांगाव्या लागल्या असें दिवाण साहेब स्पष्ट झणतात. तुमचे पूर्वज असे अविनीत राजे होते की, त्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्राचे पराकाष्ठेचें नु. कसान केले आणि दरबारांतील सर्व कामदार लोक इतके ळांचखाऊ आणि अ प्पलपोटे होते की, त्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही प्रकारची लबाडी करण्यांत बाकी ठेवली नाहीं, असें महाराजांच्या मनांत के ठसविण्यासाठीं दि- वाणजी यांस एडमंडबर्क या लोकोत्तर वक्त्याची प्रसह्य उक्ति उसनी घ्यावी लागली. राज्यांत राज्यद्रव्य वसूल करणारा कोण तर प्रत्यक्ष बलात्कार; हिशेब ठेवणारा को- ण, तर प्रत्यक्ष बाह्यघोळ; प्रत्यक्ष कपट याजकडे जामदार खान्याचे अधिपत्य; मू- तिमंत विस्मरण हा आठवण देणार: प्रत्यक्ष निन्हव हा वृत्तान्त निवेदक अशी मागील राज्यकारभाराची स्थिति होती असें महाराजांस व या सगळ्या जगास दिवाणसा- हेब यांनी उत्क्रोषपूर्वक निवेदन केले आहे. यांत सत्य किती आहे, याविषयीं वर जी हकीगत सांगितली आहे, यावरून महाराजास व ढोकांस विचार करावयाचा आहे. ह्या त्यांच्या लेखापासून दरखी कामदार लोकांच्या मनांवर ज्या जखमा झाल्या आहे- त त्या अचिकित्सनीय आहेत. दिवाणसाहेब यांची करुणा झाल्यावांचून त्या अ पवादांतून मुक्त होण्यास त्या बापड्यांपाशी कांहीं देखील इलाज नाहीं. पण महारा- जांच्या पूर्वजांचा वृत्तान्त निवेदन करतांना दिवाणसाहेब यांनी त्यांची योग्यता, अ धिकार आणि थोरवी यांजकडे पराकाष्ठेचें अनवधान देऊन सर्वांस एकाच मालिकें- त गोंवून अगदी अविनीत मनुष्यांच्या पंक्तीस नेऊन बसविले आहे. त्यांत सत्य कि तो आहे, याचा महाराजांनीं अवश्य तपास करावा; आणि त्याप्रमाणें महाराज कर. तीळ अशी खातरजमा आहे. कारण विशुद्ध कुलोत्पन्न पुरुषाला आपल्या पूर्वजां ची केलेली खरी गर्हा देखील आवडणार नाहीं, मग मिथ्या तर कोठून आवडणार. महाराजांहीं आपले आजे सयाजी बोवा यांच्या कारकिर्दीत राज्यव्यवस्था क शी होती याचा शोध केला ह्मणजे, ते किती परिमित व्ययी होते, राज्यद्रव्याविषयी त्यांस किती काळजी होती, वगैरे पुष्कळ गोष्टींवि षयीं दिवाणसाहेब यांच्या लेखाविरुद्ध पुरावा सापडेल. कै० गणपतराव महाराज यांच्या कारकिर्दी पर्यंत जमेच्या संबंधानें बडोद्याच्या राज्याची स्थिति फार निकष्ट होती, राज्यावर मनस्वी कर्ज होतें, व त्या कर्जास इंग्रज सरकारांनी जामिनकी केल्यामुळे राजास पराकाष्ठेचा त्रास होत असे. त्यां