पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)
उपोद्घात.



बस्तूंनी भरलेले आहे. अशी कोणतीही वस्तु नाहीं कीं, जिनमध्ये चांगला व वाईट गुण नाहीं. जिजमध्ये चांगल्या गुणांचा अंश फार ती चांगली आणि वाईट गुणांचा अंश फार ती वाईट. वस्तूचे चांगले गुण कळल्यापासून जसा फायदा आहे तसाच वाईट गुण कळल्यापासूनही आहे. किंबहुना वाईट गुण कळल्यापासून विशेष फायदा आहे; कारण वाईट गुणांची शक्ति फार जबर आहे. स्पर्श केल्याबरोबर प्राणनाश करणारी अशीं कांहीं विषे आहेत, पण प्राशन केल्याबरोबर विष उतरावे अशी कांहीं संजीवनी औषधी अद्याप उपलब्ध झाली नाहीं. तेव्हां मल्हारराव महाराजांच्या कारकीर्दीच्या इतिहासांत दोष बहुत आहे तेच सरहस्य जाणून घेणे योग्य व अवश्य आहे.
सुलतान याचा पराजय शिक्षण घेऊन आपल्या  मुसलमान लोकांनी हिंदुस्थान देश कसा काबीज केला, प्रतापशाली शिवाजी महाराज यानी मुसलमानांचा पराजय करून मराठ्यांची सत्ता कोणत्या प्रकारें स्थापित केली, पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहावर आपला पगडा कसा बसबिला, हैदरअली याने इंग्रज लोकांत कसें जेरीत आणिलें, आणि मार्किस बेलस्ली यानी टिपु करून ब्रिटिश राज्याची स्थापना कशी दृढ केली यांबद्दल देशांतील राजे यांस शौर्य, धैर्य, पराक्रम आणि चातुर्य यांचा उपयोग करण्याचा काल आतां राहिला नाहीं. सर्व राजे एकत्र मिळून एक बिघा जमीन आपल्या राज्यास नवी जोडूं म्हणतील तर तेवढे देखील त्यांच्याने होऊं शकावयाचे नाहीं. त्यांच्या पूर्वजांनी कांही मिळवून ठेवले होते त्यापैकी इंग्रजांनी कृपा करून त्यांजकडे जे कांही राहूं दिले आहे तें मात्र त्यांस सुरक्षित ठेवावयाचे आहे. इंग्रज सरकाराबरोबर कसे बागले पाहिजे, आपले राज्य सुरक्षित ठेवावयाचे उपाय कोणते, कोणत्या चुका केल्या असतां आपल्या राज्याची मल्हारराव महाराज यांच्या राज्याप्रमाणे दशा होईल याविषयीं जपून वागण्यास हा इतिहास एक उत्तम साधन आहे.
 त्यांत बडोद्याचे महाराज, दरबारांतील मुत्सद्दी मंडळी, सरदार, दरकदार, व मानकरी, राष्ट्रांतील कुटाळखोर लोक आणि इतर सर्व प्रजा यांस या इतिहासापासून उत्तम प्रकारचे शिक्षण मिळणारे आहे व या इतिहासाचे अवलोकन त्यांस फार हितावह आहे. आतां जो ह्या पुस्तकापासून होणारा फायदा चर कळविला, तो बडोदे संस्थानचे महाराज, त्यांचे सरदार, व प्रजा इतक्यांसच होणारा आहे असें नाहीं; तर ह्या पुस्तकाचे सरहस्य अभ्यासाने सर्व एतद्देशीय संस्थानिकाना, त्यांच्या सरदारांना, व प्रजेला फार उपयोग होण्याचा संभव आहे. तो उपयोग कोणता हे पुढील मजकुरावरून ध्यानांत येईल. राजाने स्वतः ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटाबरोबरच्या वागणुकीत किति सावधगिरी ठेविली पाहिजे, आपल्या नौकर लोकांचा त्यांच्या नौकर लोकांशी किति कमी संबंध ठेवला पाहिजे आणि यांत चूक घडली असतां व रेसिडेंटाबरोबर वितुष्ट पडलें असतां किति . भयंकर संकटे येऊन पडतात व सरदार व मानकरी लोक आणि आप्तवर्ग देखील कसे प्रतिकूळ होऊन बसतात, राष्ट्रांतील कुटाळखोर लोकांस कसें फावतें आणि प्रजा- पालनाकडे अलक्ष करून केवळ आपल्या दुष्ट वासना पूर्ण करण्याच्या भरीस पडल्याने व राज्यांतील कामे अयोग्य मनुष्यांच्या हाती दिल्याने कोणत्या परिणामावर गोष्ट येते