पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.

( ३ )



भाकड कथा यांची माहिती करून घेतल्याने इतिहास जाणल्याचे श्रय येते असे मुळींच नाहीं. धार्मिक राजांच्या सद्गुणापासून आणि दुष्ट राजांच्या दुर्गुणांपासून कोणते बरे वाईट परिणाम झाले हें लक्षांत घेऊन चांगल्या गुणांचे अनुकरण करण्याविषयीं आणि दुष्ट गुणांचा परित्याग करण्याविषय आपल्या मनाची प्रवृत्ति होणें हेंच इतिहासाचे रहस्य जाणणें होय आणि प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासकारांचा मुख्य उद्देश देखील हाच आहे, व त्यापासून लोकांस एक प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी परिश्रम केले आहेत व ते करीत आहेत.
 निरनिराळ्या राष्ट्रांच्या रीतीभाती, कायदेकानू, राज्यस्थापकांचे व राज्यकारभार चालविणारांचे स्वभाव, चातुर्य, बुद्धि आणि इतर सद्गुण आणि तसेच दुर्गुण देखील लक्षपूर्वक ध्यानांत घेतल्याने आपणास एक प्रकारचे उत्तम ज्ञान प्राप्त होते. प्राचीन कालच्या प्रतापशाली पुरुषांही कोणत्या लोकोत्तर गुणांनी लोकांचें मन आपल्याकडे अकर्षण करून घेऊन आपला कार्यभाग सिद्धीस नेला व कोणत्या गुणांनी प्रजेचे रंजन करून आपली राज्ये भरभराटीस आणली, आणि दुष्ट बुद्धीच्या राजांनी व त्यांच्या कारभाऱ्यांनी कोणत्या दुष्ट गुणांनी ती रसातळास नेलीं हें आपल्यास इतिहासावरून समजते. सत्पुरुषांची चरित्रे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहन त्यांचे अनुकरण करावे अशी आपल्यास बुद्धि होते, दुष्ट आणि विषयी राजांविषय व राष्ट्रांतील भ्रष्ट बुद्धीच्या लोकांविषयी आपल्या मनांत तिटकारा उत्पन्न होऊन दुष्टाचरणापासून आपले मन निवृत्त होते. संकट काळीं आपण कसे वर्तावें, स्वदेशाभिमानाची किंमत किति मोठी आहे, मोठेपणा कशाने प्राप्त होतो, आणि लोकप्रियता अथवा लोकविद्विष्टता कोणत्या गुणांनी अथवा दुर्गुणांनी प्राप्त होते याविषयीं आपल्यास परिज्ञान होते. उत्कर्ष काली आपण उन्मत्त होत नाहीं. विपत्तिकाली आपण दीन होत नाहीं, ईश्वराचे ठायीं आणि गुरुजनांचे ठायीं भक्तिभाव, धर्माविषय श्रद्धा आणि इष्टजनाविषयीं अनुराग उत्पन्न होतो. याप्रमाणे इतिहासाचा सरहस्य अभ्यास केल्याने अप्रतिम फायदे होतात. ज्ञानाचा उपयोग आहे तसाच राष्ट्रांतील याचा संसार हे एक लहानसे राज्यच आहे. प्रत्येक मनु-राज्यकारभारांतील लोकांस जसा इतिहासाच्या प्रत्येक मनुष्यास आहे. राज्यरचना कशी करावी याबद्दल प्रथम पाहून त्यापासून घेतले आहे. राज्य.विचारी शिक्षण एका मनुष्याची संसारसंबंधी व्यवस्था कारभार चालविण्यास जसें चातुर्य लागते तसेच संसार चालविण्यासही लागतें, लोकांचा असा दृढ समज आहे कीं, प्रत्येक कुटुंबांतील प्रमुख मनुष्य आपले संसाररूपी राज्य न्यायाने करावयास शिकला म्हणजे मग राज्याची गरजच नलगे आणि असा कधीं तरी काळ येईल.
 मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीचा इतिहास काय तो चार वर्षांचा आणि तोही दुष्टाचरणाच्या गायांनी भरलेला त्यापासून ते लोकांस काय शिक्षण मिळावयाचें असा कोणास सहज आक्षेप घेतां येईल. त्यास प्रत्येक वस्तूच्या अंगचे चांगले व वाईट हे दोन्ही गुण कळले पाहिजेत, हें नग चांगल्या आणि वाईट गुणांनी मिश्र अशा