पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३६९.)। होतीं कीं काय ? जो पराकाष्ठेचा उधळ्या असल व तिजोरीवर अमर्याद सत्ता चा लवून आपल्या मित्रांना व कृपेंतील मंडळीस सधन करण्यास इच्छित असेल, तो तर राज्याच्या जमेवर आणि खर्चावर जास्त नजर ठेवून आपल्या जाणतेपणांत को. णास एक पैसाही खाऊ देणार नाहीं: कारण उधळपणाच्या खर्चाकरितां त्यांस पुष्कळ द्रव्याची अपेक्षा साहजिक असावयाची. जवाहिराचें अधिक मोल करून त्याबद्दल गायकवाडांनीं नजराणे घेतले असें दि वाणसाहेब म्हणतात. व त्याबद्दल त्यांजपाशीं प्रमाणें ही आहेत असे दिसतें. त्यांची समजूत अशी झाली आहे की, जवाहिराची किंमत राष्ट्राच्या खजिन्यांतून देण्यांत येत असे. आणि अधिक मोल करण्याबद्दल ते जो नजराणा घेत तो ते आपल्या खाजगींत जमा करीत असत. पण होच समजूत चुकीची आहे माजी गायकवाड अमुक मिळकत आपली खाजगत आणि अमुक जरी अगदी सूक्ष्म भेद ठेवीत नव्हते, तरी खाजगी आणि सरकारी असे दोन वि- भाग निराळे होते. खासगीचा दिवाण निराळा आणि राज्याचा दिवाण निराळा. राज्याच्या दिवाणाचा मगदूर नाहीं कीं, खाजगी संबंधी कारभांत तो तोंड घालील- अशी पूर्वीची व्यवस्था होती. राजवाड्यांत जे जवाहीर खरेदी करावयाचें तें गाय- कवाड स्वतः खरेदी करीत असत. व त्याची किंमत ही खासगीच्या जामदार खा- असे दिसते. राष्ट्राची असा न्यांतून देत असत. सरकारी खात्याचा जवाहिराच्या खरेदीशीं कोणत्याही प्रका- रचा संबंध नव्हता, तेव्हां जवाहिराची किंमत अधिक करून त्याबद्दल नजराणा घे- ण्यांत फायदा तो कोणता ? बरें, आपण अशी कल्पना करूं कीं, दिवाण साहेब यांची समजूत झाली आहे त्याप्रमाणे जवाहिराची किंमत सरकारी तिजोरीतून देण्यांत येत होती. पण जवाहियास सरकारच्या तिजोरीतून ज्यास्त पैसा देवावयाचा आ- णि त्यांतून कांहीं अल्पांश नजराण्याबद्दल म्हणून घेऊन तो आपल्या खासगीत ज- मा करावयाचा, त्यापेक्षा खासगत खर्चाकरितां सरकाच्या तिजोरीतून पांच लक्ष रुपये राजाने जास्त घेतले तर त्यांस कोणी मनाई करीत होता की काय ? अगदी वेड्याप्रमाणें अशा रितीने राजद्रव्याचा अपव्यय करण्याचे त्यांस प्रयोजन तरी काय? नजराण्याच्या द्रव्यांतच गायकवाडांस कांहीं विलक्षण प्रकारचे मनोरमत्व भासत हो- तें कीं काय ? इतक्या गोष्टी विचारांत घेऊन दिवाणसाहेब यांच्या लेखाविषयीं आपणास विचार करावयाचा आहे. एक मनुष्य आपलें द्रव्य दोन पेट्यांत ठेवीत असे. त्यांपैकी एका पेटीतील द्र. व्य आपले खासगत व दुसऱ्या पेटीतील द्रव्य समाईक अशी त्या. ची समजूत होती. सामाईक द्रव्याच्या पेटीतून पाहिजेल तितकें द्रव्य त्यास घेतां येत होतें. त्यास एक जव्हेरी ह्मणाला कीं, माझी हिप्याची अंगठी पन्नास ह जार रूपयांची आहे. पण तिची किंमत लक्ष रुपये कराल तर मी तुझास दहा हजार रुपये नजराणा देईन. तो मनुष्य त्याच्या ह्मणण्याप्रमाणें दहा हजार रुपये नजराणा घेऊन आपल्या खासगत पेटीत ठेवतो, आपल्यास मोठा लाभ झाला असे मानितों,