पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास, आणि सामाईक द्रव्याच्या पेटींतून जवाहिन्यास लाख रुपये काढून देतो, अशी गोष्ट कोणी आपल्यास जर सांगितली तर आपल्यास काय वाढेल बरें ? त्या गो. ष्टीच्या खरेपणाविषयींच आपल्यास मोठा संशय येईल. राजा सर टी० माधवराव यांचे कथन त्यांहून निराळें नाहीं. इतक्यावर त्यांच्या लेखाच्या भावार्थ समजण्यांत जर चूक झाली असेल तर काही सांगवत नाही. कारण की त्यांची लेखन पद्धती फार गूढ असून दुटप्पी आहे. पैशासंबंधीं खरी स्थिती गायकवाडांस कळली असतां ते कदाचित् मितव्ययी हो- तीळ या मयानें कामदार लोक त्यांस खरी स्थिति कळंच देत नसत, असें दि. वाण साहेब यांचें ह्मणणे असून त्याविषयीं त्यांनी जीं कारणें योजिलीं आहेत. ती फार चमत्कारिक आहेत. नेमणुकच्या ऐवजीं गांवें देण्यांत येत असतं, हें राजांस पैशा- संबंधी खरी स्थिति न कळं देण्याचे कारण योजिले आहे. नेमणुकी ऐवजीं दुमा- ल्यांत गांव देण्याची देशीराज्यांत चाल आहे हे राजा सर टी० यांस चांगले माहीत असावें. व गांव दुमाल्यांत देणें हें खुद राजाच्या परवानगीवांचून होत नाही, ही त्यांस माहित असावें. कारण त्यांनी दोन तीन देशीराज्यांत दिवाणगिरी केली आहे, असे असतां तिजोरीतून नगद पैसा दिल्याने राजास जी माहिती व्हावयाची तिच गोपन करण्यासाठी नेमणुकींत गांवें देत असत असे ते ह्मणतात. हें संभवते तरी कसे हे कळत नाहीं. नेमणुकति गांवें देण्याचा हेतु असा होता की त्या नेमणुकदारास काडीवैरण, लाकुड फाटें, यांची कांहीं सोय व्हावी, त्यांची गुरे ढोरें त्यांस सायास, बांचून पोसता यावीं, गांवच्या चाकरांचा त्यांस कांहीं उपयोग व्हावा, आणि ह्यांहून' मुख्य उद्देश हा कीं, गांव चांगले अबादीस यावें. जी गांवें दुमाल्यांत द्यावयाची तीं देखीळ बहुतकरून जेथें पडीत जमीन पुष्कळ, हवापाणी वाईट, अ.णि अबादी क "रण्यास सायास फार, अशीं असतील ती द्यावयाचीं. असा मागील क्रम होता. दु मालदारांनी हजारों रुपये कर्ज काढून व ऐन नेमणुकींत नुकसान सोसून गांव अबा- दसि आणिली. आणि त्यांपासून आता काहीं फळे मिळावयाचीं, अशा संधींत कै- लासवासी खंडेराव महाराज यांच्या कारकिर्दीत माऊ शिंदे यांनीं तो हिसकून घेतळीं त्याबद्दल दिवाण साहेब यांजपुढे दुमालदारांनी फिर्यादी केल्या होत्या. पण एकदा मिळकत सरकारांत आल्यावर ती समग्रतेने परत मिळाली आहे, अशीं क्वचितच उदाहरणे सांपडतील. मग दुमाल्याचीं गांवें नेमणुकी ऐवजीं दिलीं होतीं तीं परत मिळण्याचा संभव काय ? अशी ही दुमाल्यांच्या गांवांची खरी हकीगत आहे. एकाच मनुष्यास एकंदर नेमणुक काय मिळते हें कळून येऊं नये यास्तव त्याच्या जातीबद्दल नेमणुक निराळी, त्याच्या मुलाच्या नांवें निराळी, आणि त्या खेरीज त्यांचे संबंध यांचे नांवें नेमणुक निराळी, आणि याही नेक खात्यांतून मिळत असत असें दिवाण साहेब यांचें झणणे आहे. गायकवाडांस कळविल्यावांचून ह्या गोष्टी परमारे कामदार लोक करीत होतें असा त्यांच्या ह्मणण्यांत कटाक्ष आहे. पण एका मनुष्यांस जातीबद्दल अ.