पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. प्रयोजनच नव्हते. तथापि त्यांनीं जी हकीगत सांगितली आहे, त्यांत देखील किती एक गोष्टीत त्यांची फार गैर समजूत झाली आहे, असें दिसून येतें. , जमेची चांगली व्यवस्था ठेवण्यांत विशेष हित काय ते गायकवाडांचें तेंच दुर्नय आणि अव्यवस्था यास सहाय करण्यामध्ये अग्रेसरापैकी एक. त्यांस पराकाष्ठेचा उधळेपणा करण्यास, तिजोरीवर अमर्याद सत्ता चालविण्यास, आणि आपल्या कृपें- तीळ मंडळीवर देणग्याचा वर्षाव करण्यास मिळाले म्हणजे झालें. मग राज्याची ज मा काय आणि खर्च काय याविषयी त्यास काळजी नसे. इस्तावेदारापासून ते नज- राणे घेत असत. आणि राज्याच्या जमेला नुकसान करणाची पाठ राखीत असत. याप्रमाणे एक लक्ष रुपये नजराणा घेतला म्हणजे राष्ट्रास त्यापासून तीन किंवा चार- किंवा त्याहूनही अधिक लक्ष रुपयांचे नुकसान होत असे. राजवाड्यांत खरेदी केलेल्या जवाहिराचे अधिक मोल करावें, यासाठी गायकवाडांस नजराणे दिल्याची उदाहरणें दाखवूं शकवतील. असे माजी राजावर दिवाणसाहेब यानें अपवाद ठेवले आहेत. पण सांबद्दल कांहीं प्रमाणे दाखविली नाहीत. असो. प्रमाणांची अपेक्षा न. करितां जमेच्या बाबतीत अनय आणि अव्यवस्था करण्यांत माजी राजाचा उद्देश तरी काय होता ? व त्यावरून केवळ अनुमान प्रमाण घेऊन दिवाणसाहेब यांच्या लेखाचा चरि- तार्थ काय होतो हैं आपण पाहूं. जमेची चांगली व्यवस्था ठेवण्यांत विशेष हित फ- त काय ते गायकवाडांचे असे ते ह्मणतात. आणि तेच गायकवाड दुर्नय आणि अव्यवस्था यांस बुद्धीपुरःसर सहाय करीत असत असेंही त्यांचें ह्मणणे आहे. तेव्हां ह्या परस्पर विरुद्ध वाक्यांची एकवाक्यता कशी करावी हेच कांहीं कळत नाही. मनुष्य आपला अल्प स्वार्थ साधण्याकरितां दुसप्याचें मोठें नुकसान करील हें संभ- वनीय आहे. पण आपल्याच हातानें आपलें नुकसान करण्यास कसा प्रवृत्त होईल हें कांहीं समजत नाही. आणि दिवाणसाहेब यांचें ह्मणणे तर अगदी तशा अर्थाचें आहे. ●राष्ट्राचा प्रत्येक रुपया राजाने आपली खासगत मिळकत समजावी हे चांगले नाही. यास्तव राष्ट्राच्या जर्मेतून राजाने आपल्या खासगत खर्चाकरितां पैका कि ती घ्यावा, याविषयीं नियम असावा. असे टकरसाहेब यांच्या मिनिटास जोड. लेल्या राजकारण नियमाच्या मसुद्यांत एक कलम आहे. यावरून त्या लिहिणारांची अशी समजूत झाली आहे की, देशीराजे राष्ट्राचा प्रत्येक रुपया आपली खासगत मिळकत समजतात. आणि असे जर आहे तर मग एक लाख रुपये नजराणा घेऊन तीन किंवा चार किंवा त्यांहून अधिक लक्ष रुपयांचे राजाच्या जमत नुकसान करण्याचा गायकवाडांचा उद्देश तरी काय असावा? याविषयीं योग्य. खुलासा करून घेतल्या वांचून दिवाणसाहेब यांची त्या माहितीवर श्रद्धा बसली तरी कशी !! आणि तशा माहितीवरून हा उपहासजनक लेख त्यांनी लिहिला तरी क सा !! दोन लक्ष रुपये उत्पन्नाचा परगणा दहा हजार रुपये नजराणा घेऊन दीड किंवा पावणे दोन लक्ष यांस इस्ताव्याने दिला अशीं त्यांस कांहीं प्रमाणें सांपडळीं