पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३६७) ते तितकें झाले नाही पण त्यांहून उलट त्यांस कांहींशी किष्ट दशाच प्रात्प झाली आहे यांत संशय नाहीं आणि बाहेरून फांहीं लोक असे आणिले आहेत की, त्या- पेक्षां लायक लोक बडोद्याच्या राष्ट्रांतील राहणारे मिळण्याची शक्यता असून त्यां विषयीं अगदीं हेळसांड करण्यांत आली आहे. जरूरी पेक्षा बाहेरून ज्या. स्त लोक आणून राष्ट्रांत भरणे राष्ट्रातील लोकांच्या हितास किती घातक आहे, हें सर रिचर्ड मीड आणि दुसरे कमिशनर यांनी इंडिया सरकारास रिपोर्ट केला त्यां. तीळ पंधराव्या कलमाच्या उत्तरार्धात जो मजकूर लिहिला आहे त्यावरून वाचकांस सहज समजून येईल. ते ह्मणतात कीं, बडोद्याच्या प्रजेरेवरीज जरूरीवांचून दुसऱ्या लोकांस बडो- द्याच्या दरबारच्या चाकरीस ठेवणें यापासून बडोद्याच्या लोकांचे वाईट होणार आहे ते आमचे लक्षांत आहे; परंतु ज्यांस ब्रिटिशसरकारच्या चाकरींत शिक्षण मिळावें आहे असे काळजी पूर्वक निवडून काढलेले थोडे लोक राज्यकारभारांत फेरबदल करण्याचे कामांत दिवाणाच्या मदतीस आवश्य पाहिजेत आणि जरूरी पुरते बाहेरून लोक आणण्याविषयीं महाराजही नाखुषी नाहीत असे आह्मास समजलें आहे. वरील लेखांत " जरूरी पुरते " आणि "थोडे लोक" अशीं वाक्यें आहेत त्यां- वरून ज्यास्त लोक आणणें बडोद्याच्या प्रजेच्या हितास कितीस अपायकारक झाले आहे तें लक्षांत घ्या. या गोष्टीकडे राजा सर टी० माधवराव यांनी लक्ष दिलें नाही याचे कारण काय? तर आपल्या मित्रांचें, अनुयायांचें, व मित्रांच्या मित्रांचें व अनुयायांचे हित व्हावें ह्मणून. मग आमचे राजे आपल्या मित्रांचें व अनुयायांचे हित पाहात होते याबद्दल त्यांजकडेसच दोष तरी काय ? त्यांत त्यांनीं जें कांहीं हित के- ळें तें राष्ट्रांतील लोकांचें तरी केलें होतें, बाहेरील लोक आणून राष्ट्रांतील लोकांवर लिष्ट दशा आणली नव्हती. आपल्या मित्रमंडळी पैकी कोणास इनाम ब जाहगिरी व वर्षासनें वगैरे चालू करून देणे किंवा कडी कंठ्ठया बक्षीस देणें हें त्यांस शक्य नव्हतेंच परंतु त्यांस जे करणे शक्य होतें त्यांत त्यांनीं जी कांहीं कृपा केली आहे ती आपल्या भोवतालच्या मंडळीवरच केली असून त्यांच्या भोवतालच्या मंडळीच्या कृपेस त्यांचे अनुयायी पात्र झाले आहेत. अर्थात राष्ट्रांतील राहणाऱ्या लोकांविषयीं दया माया करणारा कोणी राहिला नाहीं यामुळे ते अनुपपतीचे मात्र विभागी झाले आहेत. राजा सर टी० यांनी सन १८७५-७६च्या रिपोर्टाच्या २३१व्या कलमांत रा जाची जमा या संबंधानें पूर्वीची व्यवस्था कशी होती त्याविषयीं हकीगत सांगितली आहे. या वृत्तांत कथनांत माजी राजे आणि कामदार यांचा उपहास करण्याकडे त्यांच्या विचाराचा झोंक विशेष आहे. • पूर्वी जमेच्या बाबीं इस्ताव्यानें देत असत. त्यापासून प्रजेस उपद्रव होत असे. याविषयों या इतिहासांत हकीगत सांगितली आहे. पण ही चाल खंडेराव महाराज यांच्याच कारकीर्दीत बंद झाली होती ह्मणून त्याविषयीं उल्लेख करण्याचें त्यांस मुळीं