पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. · नाहीत. या देशांत वर्तमानपत्रे चालविणारे दोन वर्ग आहेत. इंग्लिश लोक जीं वर्तमान पवें चालवितात तीं मितव्यय करण्याच्या कामांत अगदीं विरोधी असून ब्रिटिश सर कारच्याच राज्यास नवा मुख जोडावा; इंग्लिश कामगारांचे पगार वाढवावे; शेवटीं मोठी पेनशनें द्यावीं; आणि इंग्लंडांतून जो माल देशांत येतो त्याजवरील जकात मा. फ करावी; इत्यादि गोष्टींविषयीं ते नेहमीं शिफारस करीत असतात. मितव्यय करून कराचे ओझें कमी करण्याविषयीं हिंदुस्थानवासी लोकमताची तर काहीं किंमतच नाहीं. नेटिव लोक जीं वर्तमानपत्वें छापतात त्यांत त्यांचे ह्मणणे काय आहे यासाठी कांहीं ती अवलोकन करावयाची नाहीत, तर त्यांत कांहीं राजद्रोहाचा मजकूर लिहिला आहे की काय एवढ्या करितां मात्र तीं पहावयाचीं. राजाने कर अशा वस्तूवर बसवावे की, त्या वस्तूंचा आपण होऊन उपयोग करून घेतल्यावांचून आपल्यावर कर बरूं नये! हें राजाचें कर्तव्य. पण आपल्या देशांत • अगदी कंगालालाही वांचून एक दिवस चालावयाचे नाहीं, त्या मिठावर सरकारचा जबर कर. सिव्हिल सव्हिसची परीक्षा देण्याची आपल्या लोकांस सवड सांपडू नये याक रितां मुद्दाम ही परीक्षा इंग्लंडातच घ्यावयाची, आणि एकवीस वर्षांची वयाची यत्ता एकुणीस वर्षांवर मुद्दाम आणून ठेवावयाची अशा अनेक गोष्टीं केवळ आपल्याच देशांतील लोकांचें हीत व्हावे याच बुद्धीने इंग्लिश लोक करितात. किंवा त्यांस दु- सरी कांहीं कारणे आहेत, याचा राजा सर टी० माधवराव साहेब यांनी विचार केला • नसेल, असें नाहीं. परंतु त्यांस देशींराजांचेच दोष कां उघड करावेसे वाटतें तें क ळत नाहीं. राजा सर टी० यांनी आपल्याच राज्यकारभाराकडेस लक्ष दिलें म्हणजे आज • त्यांच्या हातून जितके त्यांच्या संबंध्यांचें, मितांचें, व अनुयायांचे हित होत आहे त्यांच्या सहस्त्रांशाने देखील इतर लोकांचें हित होत नाहीं, असे त्यांस ढळढळीत दिसून येईल. आज जी बडोद्याच्या दरबारच्या चाकरीत नवी मंडळी आहे त्यांस आह्मी राजा सर टी० माधवराव साहेब यांचे मित्र व अनुयायी ह्मणतो त्यात त्यांचे आप्त संबंधी ही आहेत. राजा सर टी०माववराव साहेब यांची त्यांजवर पराकाष्ठेची मेहेरबानी आहे. क्षमा, दया आणि कृपा हे जे दिवाणसाहेब यांच्या अंगचे स्वाभाविक सद्गुण आहेत, त्यांचे बांटेकरी कायती नवीन मंडळी आहे इतकें सांगणे पुरें आहे झणजे त्यांत सर्व काही आले. या नव्या मंडळींत कांहीं लोक असे आहेत कीं, ते बाहेरू- न आणिळेंच पाहिजे होते परंतु बाहेरून किती लोक आणावयाचे याची मर्यादाच राहिली नाहीं यामुळे बडोद्याच्या राष्ट्रांतील लोकांस जी विपत दशा प्राप्प झाली आहे तशी पूर्वी कवच प्रात्प झाली नव्हती असे कित्येक लोकांचें ह्मणणें आहे. आतां तें ह्मणणें सर्वांशीं खरें नसेल परंतु राजा सर टी० माधवराव साहेब यांच्या कारकिर्दीत राष्ट्रांतील लेखनोपजीवी यांस जितकें सुख झाले पाहिजे हो-