पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३६५) पराकाष्ठेचा अडथळा करीत असत, परंतु ती संख्या थोडी आणि गुलामाच्या व्यापा- •रापासून ज्यांस नफा नाही असा लोकसमूह जास्त असल्यामुळेच त्यांचा इलाज 'चालला नाहीं; पण अमेरिकेत तसे नव्हतें. गुलाम बाळगणारे लोक फार व कायदे करण्याचा अधिकारही त्यांजकडे असल्यामुळे गुळमांस स्वातंत्र्य मिळण्यास फारच अयास पडले. • हल्लीं अमेरिकेंत अशी स्थिती आहे की काळे लोक मोठे व्यापारी असून मो ठ्या मोठ्या हुद्यावर आहेत, आणि गोरा आणि काळा या वर्णाच्या संबंधाने काहीं- एक भेद नाहीं. पण ईश्वरानें मनुष्यास आयुष्य दिले त्या बरोबरच त्यांस आयुष्याच्या संरक्षणासा- ठीं बुद्धीही दिली आहे. जर मनुष्यास स्वातंत्र्य नसेल तर बुद्धीचा त्यांस उपयोग करितां येणार नाही. यास्तव मनुष्य प्राणी हास्वतंत्र आहे मग तो कोणत्याही वर्णाचा, (रंगाचा) आणि कोणत्याही देशांतील असो, त्याच्या देहावर स्वामित्व त्याचेंच, परंतु त्यांस देखील आपले स्वातंत्र्य विकता किंवा अर्पण करितां येत नाहीं. सामान्य ह्म-- णींत देखील असे ह्मणतात कीं, मनुष्य प्राणी हा स्वतंत्र जन्मला आहे. असे विचार अमेरिकन लोकांच्या मनावर पूर्णपणे ठसून जेव्हां ते राजसत्तेतून मोकळे होण्याकरितां ल- ढाया मारीत होते, तेव्हां गुलाम लोकांच्या संबंधाने वर लिहिलेल्या गोष्टी अमेरिकेत घडत होत्या. यांपेक्षां स्वहिताविवयीं तत्परता आणि परराहिताविषयों पराकाष्ठेची अनास्था या विषयीं दुसरीं तो कोणती उदाहरणे दाखवावीं? बडोद्याच्या राजांनी अशी तीं कोणती अघोर पापे करून आपलें व आपल्या मित्रांचें आणि आश्रितांचेच हित पाहिलें होते कीं, त्याबद्दल मोठ्या आवेशानें त्यांच्या वर्तनावर टीका करून लौकिकांत त्याजावे. षयींची पुज्यबुद्धी कमी करावयाचा यत्नकरून आपलें यश वाजवीपेक्षा जास्त वाढवावें.. हिंदुस्थानांत इंग्लिश लोकांचे राज्य झालें हा आपल्यावर एक ईश्वरी प्रसाद झा- ला असे आपण मानतों. परकीय देशांतील लोकांनी पूर्वी आपल्या देशावर राज्ये करून आपल्यास जीं दुःखें दिलीं तीं मनांत आणलीं ह्मणजे आपल्यास असे वाटते, की, आपल्या देशांत आज रामराज्य आहे. परंतु स्वहिताच्या संबंधाने इंग्लिश लो- कांची आपल्या बरोबरीची वर्तणूक अशी आहे कीं, अमेरिका आणि इंग्लंड या दे- शांतील प्रजेशीं जर आपण आपली तुलना करून पाहिली तर काहीं अंशांनी आपण गुलामागरच्याच स्थितीत आहोत की काय, असा देखील भ्रम होतो. आतां हें असे कशाने झाले आहे ? इंग्रज लोक अशिक्षित, रानटी आणि क्रूर असल्यामुळे की काय ? नाहीं. ते सुधारलेले सुशिक्षित, आणि पराकाष्ठेचे दयाळू आहेत. परंतु स्वहिताकडे त्यांचा विशेष कल असल्यामुळे आमच्या देशाचीही स्थिती आहे. आज इंग्लंड देश इतका संपन्न आहे कीं तो हैं सर्व भूमंडळ खरेदी करील. परंतु त्याच्या तृष्णेस कांहीं मर्यादाच नाहीं. मोठचा योग्यतेच्या आणि पगाराच्या जा या सर्व गौरवर्णांनीच व्यापल्या आहेत. त्यांस जसे मोठे पगार व पेनशने मिळतात तसे पगार पेनशनें या भूमंडळावरील कोणत्याही राष्ट्रांतील कामगार लोकांस मिळत