पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दलालाने ह्मणावें महाराज, ही दासी विकावयाची आहे. ही पाहा कशी अंगाने बळकट आहे आणि तिचे डोळे पहा कसे पाणीदार आहेत. तिघ्यामध्ये दोष ह्मणून कांहीं नाहीं व शिवाय वरताळ्यास तीज बरोबर एक लहानसें मूल आहे. खरे दी करणाराने ह्मणावें तें मुलगें ना, तें मला नको. त्यास एक दमडीला देखील मी खरेदी घेणार नाहीं. . लिलाव बोलणाराचें तें मसाडें ओरडणें, खरेदी करणारा चें ईर्षंचें मागण, बाजारबुणगे यांची मध्येच अभद्र भाषणे आणि कळकळाट, ढिला. वांत माळ स्वस्त मिळाल्याबद्दल खरेदी करणारांचे आनंदभरीत हास्य, गुलाम लो- कांचें कण्हणें, किंकाळ्या, रुदन, परस्परांचें शेवटचें आलिंगन आणि त्यांपासून निर्दय पणाने त्यांचे द्विधाकरण करून त्यांस फरफरा ओढणे त्या योगानें या लिलावाच्या बाजारांत असा कांहीं कोलाहल होत असे कीं, यमलोकींच्या नर्कयातना प्रत्यक्ष आपण येथें पाहतों की काय असा पाहणारांस भास होत असे. गुलाम लोकांस कोंडून ठेवण्याकरितां मोठ्या मजबूत इमारती बांधल्या होत्या. त्यांत त्यांस गुराप्रमाणे सांकळ्यांत अडकवून ठेवीत असत. गुळाम लोकांस विदेशांत न्यावयाचे झाले ह्मणजे त्यांस एका सांकळीत अशा रीतीने गुंतवीत असत की तीन किंवा चार हत्यारबंद लोकांनी हजारों गुलाम सुरक्षितपणे शेंकडों कोस घेऊन जावे. गुलाम लोकांस स्वातंत्र्य मिळाल्यावर कांहीं वर्षे त्यांची स्थिती अशी भयंकर हो- ती की गुलामगिरी बरी पण स्वातंत्र्य नको. कायद्याने त्यांस स्वातंत्र्य मिळाले होतें परंतु त्यांजविषयीं लोकमत आणि त्यांजबरोबरचा व्यवहार त्यांस इतका दुःखदायक होता कीं, दास्यावस्था आणि स्वातंत्र्य हीं त्यांस समान भासत. गौरवर्ण त्यांजबरोबर कधीही बरोबरीच्या नात्याने बोलावयाचा नाहीं; त्यांस चाकरी मिळाली तर तीही गुलामगिरीच्या तुलनेची मिळावयाची; त्यांनी व्यापार करावयाचें मनांत आणिले तर त्यांजबरोबर कोणी सवदा करावयाचा नाहीं; त्यांनी जर दुकान घातली तर त्या दुका नांत गौरवर्ण पाऊल ठेवावयाचा नाही. त्यांच्या कारखान्यांत गौरवर्ण चाकर राहावयाचा नाहीं. ते जर हजामत करण्याकरितां न्हाव्याच्या दुकानांत शिरले तर त्यांस तो निर्भत्सना करून हांकून लावी, कारण की, गौरवर्ण कायांची गि-हाईकी बुडेल ह्मणून. ज्या गाडीत गोरे लोक बसतील त्यांत त्यांस बसण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणें गलबतांत दे- खील यांस अगदी वरच्या मजल्यावर बसवीत असत. हाटेलांत त्यांस उतरण्यास जागा मिळावयाची नाही. नाटकगृहांत पैसा देऊनही त्यांस उंच प्रतीची जागा मिळावयाची नाही. गोन्या लोकांकरितां स्थापित केलेल्या विद्यालयांत त्यांचा प्रवेश नाहीं. व त्यांस स्वतःकरितां शाळा स्थापन करण्याचाही अधिकार नव्हता. • गुलामगिरीचा धंदा बंद करून त्यांस स्वातंत्र्य देण्यांत इंग्लंड हें अग्रगण्य आहे. आणि यासंबंधानें महत् यशाचे विभागी कायते तेंच आहे. परंतु हा व्यापार चालवि ण्यात ज्यांचे हित होतें ते इंग्लिश लोक गुलामास मोकळीक देण्याच्या कामांत