पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार (३६३) "" वितीकरितां गौरवर्ण कायाची साक्ष पटून आरोपी यास गुलामांच्या वनाबद्दल शासन मिळण्याचा प्रसंग फारच विरळा. गुलाम पळून जात असतां अथवा आपल्या धन्याच्या समोर होऊन हरकत करीत असतां धन्यानें त्या गुलामाचें पाहिजे तें केलें तरी त्यांस त्याबद्दल पूर्ण मोकळीक आणि माफी. मानसीक आणि लोकव्यवहार संबंध त्या गुलामळोकांची स्थिति तर पराकाष्ठेची दुःखरूप आणि श्रवण करणारा स रोमहर्ष जनक होती. गुलामास कोणी मूळ अक्षरें शिकविण्याचा प्रयत्न केला तर त्यास उम्र शासन करावे असा कायदा होता. अमेरिकेच्या उत्तरभागांत क्यारोलिना ह्मणून एक संस्थान आहे त्या संस्थानांतील यासंबंधी कायद्याच्या उपोद्वाताचें आरं भीचें वाक्य हे “ गुलामास लिहितां आणि वाचतां शिकविणे यापासून त्यांच्या मनांत असमाधान उत्पन्न होऊन त्यापासून दंगेधोपे आणि बडे उद्भवतात गुलामास का ' णी काहीं उपदेश केला किंवा अनुशासन दिले तर तो जर कृष्णवर्ण असेल तर त्यां- स एकूणचाळीस फटके मारावयाचें आणि गौरकाय असेल तर त्यास दोनशें डाल म्हणजे सुमारें ४५० चारशे पन्नास रुपये दंड करावयाचा. व्हरजिनिया प्रांताचा असा कायदा होता कीं, दिवसा किंवा रात्रीं वाचणें किंवा लिहिणें शिकण्याकरितां कृष्णवर्णलोक एकत झाले तर तो गैर कायदेशीर मंडळीचा जमाव. अमेरिकेत जसजशी वसाहत वाढत चालली तसतसा गुलामगिरीचा व्यापार वाढला; ऐक्य झा ळेल्या दक्षणभागांतील संस्थानांचे दोन भाग झाले. एकानें गुलामांची उत्पत्ति करावी आणि दुसऱ्यानें तें लोक विदेशीं नेऊन त्यांची विक्री करावी अशी वांटणी करून घेतली. ह्या व्यापारापासून तर फारच अनर्थ उद्भवला; तो असा की नवरा व बायको आणि आईबाप व मुळे यांची ताडातोड होऊं लागली. एकानें बायको खरेदी करावी तर दुसप्याने तिचा नवरा खरेदी करावा आणि तिसऱ्याने तिचें मूळ खरेदी करावें आणि अशा विदेशांत घेऊन जावें कीं, पुनः परस्परांचें वर्तमान देखील परस्परांस कळावयाचें नाहीं मग पुनः भेट होण्याचा संभवच काय! आपण जसें घो- ड्याचा एक पुठा खरेदी करितों त्यांत कांहीं घोड़ें, काहीं घोड्या, कांहीं शिंगरें, कांहीं शिंग्या व कांहीं तट्टे असतात; त्यांपैकी चांगळे घोडे आपण आपल्या अश्व- शाळेत ठेऊन कांहीं चांगल्या घोड्या पसूपार्गेत पाठवितों आणि बाकींचा गाळ कारखान्यांत वाटून देतों. त्याप्रमाणे एका व्यापाऱ्यानें गुलामांची एक टोळी विकत घ्यावी, त्यांपैकीं शरीरानें, बळकट आणि तरुण असतील ते आपल्या धंद्यासाठीं ठे- वावें आणि बाकीचे लागलीच गिराहीकांस विकून टाकावे. कांहीं संकट वोढवलें किंवा दिवाळे निघालें म्हणजे जशी गुरेढोरें लिलावाने विकतात त्याप्रमाणे गुलाम बाजारांत विकावयाचे; त्या दीन आणि अनाथ प्राण्यांस बाजारांत नेऊन लोकसमुदायांत उभें करीत असत; त्यांत जे अविनीत आणि उपहासक लोक असत ते त्या दोनस्त्रियांचे उघडे पाहून त्यांचा उपहास करीत. घोड्याचें चापल्य दाखविण्यासाठी आपण कोरडे मारवून चाबूकस्वाराकडून त्यांस घाववितों, याप्रमाणे त्या दीनप्राण्यांचे अंगचापल्य आणि सुटसुटीतपणा दाखविण्याकरितां कोरड्याचे फडाके मारून त्यांसपळवीत असतः ४३