पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. रूं. या. जर शक्य आहे तर स्वतःचे, आपल्या मित्रांचें व अनुयायांचे हित पहात नाहीत असें या जगांत आहेत तरी कोण ? जबरी करून भाग पाडल्यावांचून दुस- प्याच्या स्वार्थाकरितां आपल्या स्वार्थाची उपेक्षा केली असे सत्पुरुष जगावर फारच थोडे अवतरले आहेत. राजसत्ताक, महाजनसत्ताक आणि लोकसत्ताक या तीन प्रकार- च्या राज्यपद्धतीमध्ये लोकसत्ताक राज्यपद्धती ही सर्वोत्तम असा एकवाक्यतेने निर. पवाद सिद्धांत झाला असून होईल तितकें करून त्या पद्धतीवर राज्यकारभार अणून ठेवावयाचा, हा सुधारलेल्या राष्ट्रांचा मुख्य उद्देश आणि त्यासाठींच रशियाच्या मा. जी बादशहास निहीलीस्ट लोकांनी मारले आणि हल्लीच्या बादशाहास मारण्याचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकन लोकांनी तर मोठ्या मोठ्या लढाया करून आणि पराकाष्ठेचीं दुःखें व संकटें सोसून लोकसचाक राज्यस्थापन केले असून अनुकरण करण्यास लोकसत्ताक राज्याचा असा नमुना कोठेंही नाही अशी ख्याती आहे. ते अमेरिकन लोक स्वार्थांध होऊन मनुष्य प्राण्यावर कसा अनर्थ गुजरीत होते या. विषयींची थोडीशी हकीगत येथें सांगितली असता मराठी वाचकांस एक अपूर्व गो. ष्ट कळली असें होईल. आणि या जगांत आपला आणि आपल्या इष्टमित्रांचा स्वार्थ पहात नाही तरी कोण असे वर झटलें आहे ते खरे आहे असे समजून येईल. अमेरिकन लोकांनी लढाया करून स्वातंत्र्य मिळविले आणि लोकसत्ताक राज्याचा वारींगटन शहरावर झेंडा फडकाविला तेव्हां त्यांच्या राज्यांत पचवीस लक्ष गुलाम होते. एकीकडे अमेरिकन स्वातंत्र्य मिळविण्याकरितां लढाया मारीत होते आणि एकीकडे गुलाम लोकांचें बंधन मजबूत आणी घट्ट करीत होते. एकीकडे जय मि ळवून विजयी सेना मोठ्या थाटमाटानें वाशींगटन नगरांत प्रवेश करीत होती आ णि शहराच्या एका बाजूस हजारों गुलाम लोकांच्या टोळ्यावर काम करण्याकरित कोरडे उडत होते. व्याघ्रांच्या पुढील अवडतें मक्ष ओढून नेणारावर तो जसा क्रो- धाने तुटून पडतो त्याप्रमाणे गुळामांवरील जुळमाविषयों कोणीं गान्हाणे केले किंवा त्यांचा पक्ष घेतला की त्याजवर अमेरिकन लोक तुटून पडत असत. आपण जसें आपल्या जनावरांस त्यांची शक्ती कार्यक्षेम ठेविण्याकरितां खाण्यास घालतो त्याप्रमा- णें गुलामांचे देह बलविशीष्ट असावें यासाठी त्यांस खाण्यास देतअसत परंतु तें भक्ष्य अ गर्दी निकृष्ट धान्याचे असावयाचें. ऊष्ण हवेने त्या दीनप्राण्यांचें थंडी वान्यापासून त्राण केल्यावर मग त्यांस वस्त्रे पुरविण्याची मालकांस गरज तरी काय!! व्यंगीकरण करणे किंवा ठार मारणे याखेरीज गुलामास दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे शारीरदंड करण्यास माळ- कांस जशा काय कुलमुखत्यारीच्या सनदाच मिळाल्या होत्या. गुळामांच्या अव यवाची शाश्वत हानी केली तर करणारास स्वल्प दंडाची मात्र शिक्षा करावयाची, प्रा. णघाताबद्दल मात देहान्त शासन करण्याचा कायदा होता परंतु त्याबद्दलचा पुरावा गौरवर्ण मनुष्याच्या साक्षीने झाला पाहिजे तेव्हा शाबीती होणार. जे न्यायाधिश ते हजारो गुलामांचे मालक यांचा वोढा कायतो आरोपी याजकडे तेव्हां गुन्ह्याच्या शा